राज्यपालांचं ते वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान; चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी केला निषेध!

माहूर:- गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे.अशी प्रतिक्रिया राज्यात उमटत असताना माहूर शहरातील  नक्षत्र व त्रिषा कोंडे या दोन्ही   चिमुकल्या विद्यार्थिनींनी जय महाराष्ट्र….  भगतसिंग कोशियारी यांचा जाहीर निषेध असे मजकूर लिहलेले पोस्टर हातात घेऊन निषेध नोंदविला आहे.
काल शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाच्या नामकरण कार्यक्रमात राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सोशल मीडिया वर राज्यपाल कोशियारी प्रंचड ट्रोल होत आहेत. कोश्यारींवर विरोधकांपासून ते सामान्य जनतेकडून टीकेची झोड सुरु झाली आहे. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.याआधी देखील राज्यपाल अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत.राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा निषेध राज्यात सर्वत्र होत असताना माहूर मध्ये सुद्धा त्याचे लोन उमटले.माहूर शहरातील जीनियस किड्स स्कूल च्या विद्यार्थीनी नक्षत्र कोंडे (07) व त्रिषा कोंडे (05) या भगिनींनी महाराष्ट्राबद्दल ची अस्मिता दाखवत राज्यपाल कोशियारीच्या निषेध असणारे पोस्टर झळकावले आहे.