आमदार भीमराव केराम यांनी घेतला विविध विभागाचा आढावा! कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याच्या केल्या सूचना!

माहूर:- माहूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज दिनांक 30 शनिवार रोजी आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली माहूर तालुक्यातील सर्व कार्यालयातील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत आमदार भीमराव केराम यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याच्या सूचना केल्या.
माहूर तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आमदार भीमराव केराम यांनी शहरी भागात नगरपंचायत नाहीतर ग्रामीण भागात पंचायत समिती मार्फत हर घर झेंडा उपक्रम यशस्वी करा अशा सूचना केल्या तर माहूर नगर पंचायत ने केलेल्या   नियोजनाची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या कडून घेतली व समाधान व्यक्त केले.वीज वितरण विभागाला कारभार सुरळीत करण्याची ताकीद केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी अद्यावत प्रस्ताव देण्याच्या सूचना आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या, सोबतच सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे ही आमदार केराम म्हणाले.यावेळी तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी व भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल तिरमनवार, भाजपा चे माहूर तालुकाध्यक्ष दिनेश यवतकर,संदीप केंद्रे,नगर सेवक गोपू महामुने यांची उपस्थिती.