शेती पूर्ण पाण्यात गेली…. घर पडली…. अन्नधान्य ही भिजले….समद उध्वस्त झालं…. आत्महत्या करावी वाटते साहेब…

माहूर(सरफराज दोसानी) शेती पूर्ण पाण्यात गेली…. घर पडली…. अन्नधान्य ही भिजले….समद उध्वस्त झालं…. आत्महत्या करावी वाटते साहेब….अशी व्यथा माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील महिला शेतकऱ्यांनी मांडताना आश्रु अनावर झाले.माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती  निर्माण होऊन शेतीचे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अशा संकट काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार  आज  शनिवार दि. ३० जुलै रोजी माहूर दौऱ्यावर आले होते.या वेळी त्यांच्या समवेत राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,जिल्हा अध्यक्ष हरिहर भोसिकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,कार्यकर्ते,शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.
विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी भल्या पहाटे सकाळी साडे सात वाजता माहूर तालुक्यातील दत्तमांजरी शिवारातील शेतात पोहचले.या वेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टी च्या हाहाकराणे शेत शिवार,घर,परिवाराच्या होत्या चे नसे नव्हते झाले या बाबत आपली व्यथा मांडली.तर दत्तमांजरी व मांडवा शिवारातील देवस्थानच्या जमिनी कासणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला 2014 पासून शासनाचे अनुदान मिळत नाही,तहसीलदार माहुर व महसूल प्रशासनाने मुद्दाम देवसस्थानाची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वे केले नाही महसूल प्रशासन आमच्या जीवावर उठले असल्याची व्यथा मांडली असता अजित दादा पवार यांनी नाशिक येथील देवस्थानाच्या अशाच एका प्रकरणाचा अहवाला देत नाशिक धरतीवर माहूर देवस्थान जमिनीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी वाट मोकळी करण्यात येईल यासाठी शेतकऱ्यांची शिष्टमंडळ मुंबईला घेऊन या अशा सूचना केल्या. विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी माहूर तालुक्यातील दत्त मांजरी, मांडवा, पाचुंदा व रस्त्यात शेताच्या समोर उभे असलेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, केवळ पंधरा किलोमीटर प्रवासात त्यांनी शेतकऱ्यांच्या आठ ते दहा शिष्टमंडळाच्या समस्या जाणून घेतल्या व माहूर तालुक्यातील भयावह परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी आजच चर्चा करून शेतकऱ्यांना त्वरित राज्य शासनाकडून अनुदान कसे मिळवून देण्यात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.माहूर दौरा सुरू करण्यापूर्वी विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी माहूर गडावरील आई रेणुका देवी मंदिराच्या पायऱ्या चे दर्शन घेतले.
माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,जिल्हा अध्यक्ष हरिहर भोसिकर,समाधान जाधव,दिनकर दादा दहिफळे,मेघराज जाधव,प्रकाश राठोड,मारोती रेकुलवार,वसंत सुगावे,अमित येवतिकर,कुंदन पवार,बंडू नाईक,दत्तराव मोहिते,मधुकर राठोड,साजिद खान,प्रा.भगवान राव जोगदंड, अमजद पठाण राहुल नाईक,बंडू पाटील भुसारे,कुंदन पवार,जाहीर खान,रफिक सौदागर,अपसर आली,इरफान सय्यद,रोहिदास जाधव,लक्ष्मण घुले,मनोज कीर्तने,नम्रता कीर्तने,अंकुश जाधव,विनोद खूपसे, पुरुषोत्तम रेड्डी, गणेश बक्किवार, बंटी पाटील, बालाजी बामणे,कलावती ताई बंडू भुसारे,उद्धव आडे, कृष्णा यल्टीवार,पी. डी.जाधव,अनिता कदम,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.