विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी माहूर दौऱ्यावर!

माहूर:-नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अशा संकट काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे शनिवार दि. ३० जुलै रोजी माहूर दौऱ्यावर येत असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे शनिवार रोजी सकाळी ८.०० वा. माहूर तालुक्यातील दत्तमांजरी, व कुपटी या शिवारातील शेतीची पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दिली.

माहूर किनवट सह नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाची मोठी हानी झाली आहे, तर अनेक घरांची पडझड सुद्धा झाली आहे. मात्र राज्य सरकार कडून बाधित शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.मुसळधार पावसाने हाहाकार मजविल्याने या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, व अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. विरोधी पक्ष नेते ना अजित दादा पवार यांच्या समवेत माहूर सह नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यात माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सुद्धा सोबत असणार आहेत.अशी माहिती मा.आ.प्रदीप नाईक यांनी दिली.