नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने बकऱ्या चारणाऱ्या वृद्धाचा मृत्यु

यवतमाळ(हरीश कामारकर):- नाल्याला आलेय पुरात वाहुन गेल्याने बकऱ्या चारणाऱ्या वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यु झाल्याची घटना महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथे घडली.

हिवरा(संगम)येथील रामजी राघोजी मेटकर (वय७२वर्षे)हे काल गुरूवारी(दिनांक२८जुलै)रोजी नेहमी प्रमाणे आपल्या बकऱ्या चरण्यासाठी काऊरवाडी शिवारात गेले होते.दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जोराचा पाऊस पडल्याने ते आपल्या बकऱ्या घेवुन घराकडे निघाले रस्त्यातील नाला ओलांडत असतांना अचानक नाल्याला पुर आला पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहुन गेले .बकऱ्या मात्र घराकडे आल्या परंतु आपले वडील घरी न आल्यान त्यांच्या मुलांनी व परिवाराने सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतु कोठेच पत्ता लागला नसल्याने आज शुक्रवारला(२९जुलै) सकाळी पुन्हा परिवाराने व नातेवाईकांनी पुसनदी काठ व नाल्यामध्ये शोध घेतला असता नदीला नाला मिळत असल्याच्या काही अंतरावर रामजी यांचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळुन आला.या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रविण कदम व महसुल कर्मचारी जीवन जाधव यांनी प्रशासनाला कळविली.घटनेची माहिती मिळताच बिट जमादार संतोष जाधव यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला आहे.रामजी मेटकर यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, एक मुलगी,नातवंडे असा आप्त परिवार आहे.