वाई बाजार – लखमापूर मध्ये मातब्बरांना हादरा;वानोळा मध्ये भाऊगर्दी होणार!

माहूर(कादर दोसानी):- माहूर तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेच्या तीन पैकी 2 गट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी राखीव झाल्याने मातब्बरांना हादरा बसला आहे,तालुक्यातील एकमेव वानोळा गट हे सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने त्या ठिकाणी वाई बाजार व लखमापूर चे इच्छुक भाऊगर्दी करणार आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार गट अनुसूचित जाती तर लखमापूर गट हे अनुसूचित जमाती साठी राखीव झाले आहे.त्या मुळे या ठिकाण च्या इच्छुकांचे हिरमोड झाले आहे.या दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान जीप सदस्य समाधान जाधव,मारोती रेकुलवार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, सुदर्शन नाईक काँग्रेस चे डॉ.निरंजन केशवे, भाजपचे रमण जायभाये,हे प्रमुख इच्छुक दावेदार होते,मात्र हे दोन्ही गट आरक्षित झाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांना आता वानोळा हा एकमेव गट सर्वसाधारण झाल्याने पर्याय म्हणून आहेत.तर वानोळा जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे विद्यमान सदस्य संजय राठोड यांना उमेदवारी साठी केशवे कंपनीचे आव्हान असू शकते,शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वानोळा गटात अर्धा डझन इच्छुक असून या ठिकाणी उमेदवारी देताना माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नाकी न येणार आहे. कारण वाई बाजारचे जिल्हा परिषद गटाचे समाधान जाधव, कुंदन पवार, बंडू पाटील भुसारे, अभिजीत राठोड, हे प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेत मात्र इच्छुकांची संख्या जास्त नसल्याने नुकतेच शिंदे गटात सामील झालेले सुदर्शन नाईक किंवा ज्योतिबा दादा खराटे यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो असे कयास आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी प्रमाणेच वानोळा गटामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असून भाजपा नेते धरमसिंग राठोड, रमण जायभाये हे या ठिकाणी प्रमुख दावेदार आसणार आहे. तालुक्यात एकमेव सर्वसाधारण गट असल्यामुळे राज्यस्तरीय पक्षासह  विविध संघटना व अपक्ष उमेदवारांचाही या ठिकाणी भरणा असणार आहे यात शंका नाही.तर प्रमुख राजकीय पक्षांपुढे वाई आणि लखमापुर या आरक्षित मतदार संघात उमेदवारासाठी चाचपणी करावी लागणार आहे तूर्तास आजच्या आरक्षणामुळे काही खुशी अधिक गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माहूर पंचायत समिती आरक्षण जाहीर!
पंचायत समितीच्या सभागृहात आज सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सहा पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत काढण्यात आली.वाई बाजार (अनुसूचित जमाती महिला ), गोडवडसा (नामाप्र),वानोळा (सर्वसाधारण महिला),हडसनी (सर्वसाधारण),लखमापूर (सर्वसाधारण),पापलवाडी (सर्वसाधारण महिला) असे सहा गणाचे आरक्षण काढण्यात आले यावेळी तहसीलदार  किशोर याधव,गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,नायब तहसीलदार राजकुमार राठोड,व्यंकट गोविंदवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण

सारखाणी (सर्वसाधारण)
मांडवी (सर्वसाधारण)
जलधारा (सर्वसाधारण)
गोकुंदा (अनुसूचित जाती)
इस्लापूर (अनुसूचित जाती)
मोहपुर (अनुसूचित जाती)                                          बोधडी (अनुसूचित जाती)

माहूर तालुक्यातील जीप गट चे आरक्षण

वाई बाजार (अनुसूचित जाती)
लखमापूर (अनुसूचित जमाती)
वानोळा (सर्वसाधारण)