जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

नांदेड:- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे.

तसेच जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता व तालुका माहूर , हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगांव (खै), लोहा व मुखेड येथे 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पंचायत समिती सदस्य पदांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.