अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मोबदला द्या:- मा.आमदार – प्रदीप नाईक

माहुर (गजानन भारती सर):-  या वर्षी चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कोवळ्या बाळस पिकावर बेसुमार अतिवृष्टी व पुरांचा अकाली रुद्रावतारी मारा झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे माजी आमदार प्रदीप जी नाईक यांनी आज माहूर तालुक्यातील वानोळा कुपटी ईवळेश्वर हिंगणी ते रुई हडसणी पर्यंत नदीकाठचा नुकसान ग्रस्त शेतशिवार शेकडो शेतक-या सह रिमझिम पावसात पिंजून काढत भेटी देऊन पाहणी केली व महसुल अधिकाऱ्यांना सुचेना केल्या.
मुळात शतकानंतर आलेल्या कोरोना च्या महाभयंकर बिमारीत मागील वर्षी शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन कमालीचे कोलमडले. यावर्षी कशीबशी हिरवी स्वप्न पाहताना शेतकऱ्यांनी महागा मोलीचे बियाणे पेरले. परंतु पेरणीतच बाळस पिकावर  अतिवृष्टीचा प्रलयकारी मारा झाल्याने कुठे पिके तर कुठे पुराच्या पाण्यात  शेतीच खरडून गेल्याने शेतकऱ्यावर उत्पन्न सोडा पण माती द्या मज माती म्हणण्याची केविलवाणी वेळ आली आहे. तेव्हा महसूल प्रशासनाने पिकांबरोबर शेतातील माती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना विशेष भरीव मदत मिळेल असे अहवाल शासन दरबारी द्यावे म्हणजेच खचून गेलेल्या शेतकऱ्यास आपले जगणे उभारण्यासाठी आधार मिळेल.असे अहवान माजी आमदार प्रदीप नाईक यांनी उपविभागीय महसूल अधिकारी किनवट व तहसीलदार माहुर यांना केले आहे.
              सुरुवातीलाच पैनगंगा नदीला प्रलयकारी पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे कमालीचे नुकसान झाले आहे.पिडीत शेतकऱ्यांचे हेच दुःख जाणून घेण्यासाठी दिंघडी(धा) पासुन ते रूई मांडणी पट्ट्यातील गावोगावी शेतक-यांना भेटी देऊन भावनिक आधार देत त्यांनी आपल्या कुशल राजकीय पालकत्वाच्या नेतृत्वाचे दर्शन नाईक यांनी दिले. यावेळी माजी.आ.प्रदिप नाईक यांनी कुपटी येथील नुकसानग्रस्त शेतशिवार व तुटलेल्या राष्ट्रीय महामार्ग चे पाहणी केली.या  वेळी माहुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते, विनोद राठोड, जेष्ठ कार्यकर्ते बंडू पाटील भुसारे, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम पाटील, माजी पं. स. सदस्य रमेश राठोड, पत्रकार गजानन भारती, मारुती इंगळे, गौतम महामुने, सरपंच पवन बुरकुले, देवानंद चोभे, देवीसिंग पवार, भीमराव राठोड, विजय शेळके, अवधुत भुसारे, सुरेश टेकाळे, पांडुरंग भुसारे दत्ता राठोड, गंगाराम रणमले सह युवा कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील व तमाम पिडीत शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.