माहूर:- मुसळधार पावसाचा धुमाकूळ रविवार दिनांक १० पासून कायम असल्याने माहूर तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे.पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून दरम्यान गुरूवारी दिनांक १४ रोजी दुपारी १ वाजता किनवट कडे जात असताना नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी पैनगंगा नदीची पाहणी करून जीर्ण अवस्थेत असलेल्या कमकुवत पूलाबाबत व निर्मानाधिन नवीन पुला संदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,तहसीलदार किशोर यादव,गट विकास अधिकारी एस.जी.कांबळे,नायब तहसीलदार राठोड, यांच्या सह उपस्थित अधिकाऱ्यांशी 15 मिनिटे चर्चा करून दौरा आटोपता घेत ते किनवट कडे रवाना झाले.या वेळी त्यांनी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या कडून माहूर शहर व तालुक्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाबत माहिती घेतली.
माहूर तालुक्यात ग्रामीण भागात नाल्याना पुर आल्याने अनेक गावाकडे जाणारे रस्ते वाहतुकीला बंद झाले आहेत. या परिस्थितीनंतर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. शेती पिके वाहून गेली आहे. सतत पाऊस पडत असल्याने मागील 5 दिवसा पासून सूर्यदर्शन नाही. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.सध्या पावसाची संततधार कायम सुरुच आहेसलग तिसऱ्या दिवशी माहूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे,माहूर मंडळ आज 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.माहूर तालुक्याची वार्षिक सरासरी 1016.70 आहे, तालुक्यात आज पर्यंत एकूण पाऊस 482.60 मीली मीटर पाऊस पडला आहे.

—– जिल्हा परिषद च्या पडक्या इमारती ची माहिती द्या ——
तालुक्यात झालेल्या अतिवृष्ीमुळे जिल्हा परिषद च्या मालकी असलेल्या पडक्या व जीर्ण इमारती ची त्वरित माहिती द्या अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी गट विकास अधिकारी एस.जी.कांबळे यांना केल्या.या वेळी नगर पंचायत चे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक,तलाठी काळे,मंडळ अधिकारी सुगावे,नगर सेवक प्रतिनिधी अप्सर आली,अमित येवतिकर यांच्या सह नगर पंचायत,महसूल,पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
