माहूर मंडळात अतिवृष्टी; घरांची पडझड,शेतात पाणीच पाणी! तहसिलदार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहाणी!

माहूर:-तालुक्यात सोमवार रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मंगळवारी जोर वाढल्याने अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले.माहूर मंडळात 72 मिमी पावसाची नोंद झाली,तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या  शिवारातील पिकांची व लांजी येथे झालेल्या घराच्या पडझडी ची पाहणी करुन तहसीलदार किशोर यादव यांनी शेतकऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला.या वेळी नायब तहसीलदार राठोड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव माजी सभापती मारोती रेकुलवार, यांची उपस्थिती होती. 
माहूर तालुक्यातील चार ही मंडळात मागील दोन दिवस प्रचंड पाऊस पडत आहे.त्यामुळे रस्ते, पूल, घरांची पडझड व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके पुराच्या पाण्यामुळे वाहून,खरडून गेली आहे,याची तत्काळ दाखल घेत
तहसीलदार किशोर यादव यांनी गावकऱ्यांशी थेट शेतीच्या बांधावर जाऊन व घराची पडझळ झालेल्या भागात प्रत्यक्ष पाहणी केली.शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.तसेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.या वेळी तलाठी काळे,लांजी सरपंच इंदल पवार,उपसरपंच संतोष कोपुलवार,सुनील आडे,रफिक सौदागर,अमित येवतिकर,यांच्या सह लांजी गावातील गावकरी उपस्थिती होते.