अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:- राष्ट्रवादी काँगेस पार्टी

माहूर :- तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे,तालुक्यातील बहुतांश गावात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुक्यात पावसाळ्याच्या सुरवातीला अत्यल्प पाऊस झाला होता, जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर मागील 3 दिवसापासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील कवळी पिके वाहून गेली आहे,काही गावात घरांची पडझड ही झाली आहे,परिणामी वित्त हानी झाली आहे.घरांची पडझड,तसेच शेतमालच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव युवा तालुका अध्यक्ष मारोती रेकुलवार,जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी,शहरध्यक्ष अमित येवतिकर,नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,सुनील आडे,ओम पाटील,प्रतीक कांबळे,अभिजित राठोड,शेख इरफान शेख ताजू,जीवन राठोड,यांनी निवेदना द्वारे केली आहे.