माहूर तालुक्यातील शाळांना आज मंगळवार रोजी सुट्टी जाहीर! अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय!

माहूर : तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार दिनांक १२ रोजी तालुक्यातील सर्व शाळा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे  कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी कळविले आहे.माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शाळांच्या बाबतीत व अतिवृष्टी सदर्भात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना परिस्थिती ची माहिती देऊन हा निर्णय घेतला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून माहूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, जीवनवाहिनी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. काल सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस आज मंगळवार रोजी जोरदार बरसू लागल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे.या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे असे गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी आमच्या प्रतिनिधी ला भ्रमणध्वनी द्वारे कळविले आहे.