घर Breaking news १० हजार लाच मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माहूर येथील पोलिस जमादार विरुद्ध गुन्हा...

१० हजार लाच मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माहूर येथील पोलिस जमादार विरुद्ध गुन्हा दाखल! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही!

माहूर:- रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही न करण्यासाठी माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत हडसणी बीटचे जमादार विष्णू उत्तमराव मुटकुळे (५२) यांनी १० हजार रुपये लाचे ची मागणी केल्याची तक्रार दिनांक १७ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे प्राप्त झाली होती, त्यावरून पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही  दरम्यान लोकसेवक मुटकुळे यांनी दहा हजार रुपये लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनांक ०१ जून मंगळवार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी माहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी लोकसेवक मुटकुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत जमादार विष्णु उत्तम राव मुटकुळे (५२) रा.वरुड बिबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या लोकसेवका कडून रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती,या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचा समक्ष पडताळणी करून त्यांच्या विरुद्ध गुरनं.५५/२०२१ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला. सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलिस नायक एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, अंकुश गाडेकर, मारुती सोनटक्के यांनी पार पडली. सदर गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे हे करीत आहे. या सापळ्या मुळे पोलिसा सह तालुक्यातील विविध विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!