घर Exclusive सोयाबीन चे दर घसरल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #सोयाबीन ट्रेंड;शेतकऱ्यांच्या समूहाने...

सोयाबीन चे दर घसरल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #सोयाबीन ट्रेंड;शेतकऱ्यांच्या समूहाने केलेल्या अहवणाला माहूर मध्ये प्रचंड प्रतिसाद

माहूर:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा, उपाय सुचवा, योग्य भाव मिळण्यासाठी सरकारला धारेवर धरा.तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा पण आपल्या बापाच्या हक्कासाठी ट्वीतर, फेसबुक,इन्श्टा,व्हॉटसअप अशा सगळ्या माध्यमांतून लिहते व्हा! व्यक्त व्हा!असा संदेश शेतकऱ्यांच्या एका समूहाकडून समाज माध्यमावर सोयाबीन  ट्रेंडच्या नावाने वायरल करून सोयाबीनचे दर घसरल्याने त्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल दिनांक २३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत सोयाबीन ट्रेंड  सोशल मीडियात सुरु केले होते.सोशल मीडिया मधील हॅश टॅग सोयाबीन मोहिमेत माहूर तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी मोठ्या प्रमाणत सहभागी होऊन सोयाबीन दर घासरल्याने केंद्र सरकार ला ट्रोल केले आहे.
अगोदरच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी मेटाकूटीला आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना किमान बाजार भावाचा तरी आधार मिळेल अशी आशा होती. मात्र, बाजारातही सोयाबीनचे दर दिवसेंदिवस हे घटत आहेत. या आठवड्यात तब्बल चार हजाराने सोयाबीनचे दर हे घटले आहेत. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाल्याने आवक ही वाढणार असल्यानेच दर घसरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात काय दर राहतील याची धास्ती शेकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.मृग नक्षत्रातील पेरलेले नविन सोयाबीन तयार होण्याच्या स्थितीत असतानाच १० ते ११ हजारांवरून प्रतिक्विंटलला सोयाबिन ६ हजारांपर्यंत खाली आले. केंद्र सरकार ने काही दिवसा पूर्वी १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला.दरम्यान, खाद्यतेल आयात शुल्क कमी करण्यात आली आहे.त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात करण्यात आली. या कारणांमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. सोयाबीन दराच्या घरसणीवरुन सोशल मीडियावर नेटकरी तसेच राजकारणी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहेत. सोयाबिनचे दर १० हजारांच्या पुढे गेल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु शेतकऱ्यांचा माल हातात येण्या पूर्वी पडल्याने केवळ १५ दिवसा पूर्वी असणारे भाव सध्याच्या स्थितीमुळे स्वप्नवत ठरले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे भाव कुठे वाढले तर ते कमी होण्यास आणि निम्म्यापर्यंत खाली येण्यास वेळ लागत नाही.हेच शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे.
◼️ अशा प्रकारे सरकार झाले ट्रोल… सोयाबीन ट्रेंड ला मिळाला शेतकरी पुत्रांचा प्रतिसाद!◼️
दररोज पाऊस आणि सोयाबीन चा भाव सारखाच कोसळतो..!
#सोयाबीन 
#सांगा_शेती_करू_कशी…
______________________
तुम्ही विकला असेल चहा
मग आम्हाला जमिनी विकायला लावताय काय?
#सोयाबीन
____________________
कृषिप्रधान देश : व्यापाऱ्यांनी कमवायचं, शेतकऱ्यांनी गमवायचं…
#सोयाबीन
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!