घर Breaking news वरणगावकर च्या बदलीने रेणुका मातेच्या भविकात ही समाधान; ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर...

वरणगावकर च्या बदलीने रेणुका मातेच्या भविकात ही समाधान; ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी उचलला होता संस्थान च्या अनागोंदी कारभार वर आवाज!

माहूर:- श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर संस्थान वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने धर्मदाय आयुक्तांनी निर्माण केलेल्या घटने नुसार तहसीलदार हा पदसिद्ध कोषाध्यक्ष असतो.दिनांक 17 रोजी नुकतीच बदली झालेले माहूर येथील तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कार्यकाळात रेणुका देवी संस्थान मध्ये अनागोंदी सुरू असल्याची पुराव्यानिशी तक्रार राज्यपाल पासून ते संपूर्ण संबंधित विभागा सह मंत्र्यांपर्यंत देऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे रेणुका देवीचे निस्सिम भक्त, जेष्ठ पत्रकार संपादक डॉ.प्रशांत कोरटकर यांनी समाज माध्यमांवर या पूर्वी त्यांनी केलेल्या तक्रारीचे पुरावे जोडून वरणगावकर यांची बदली केल्याने महा विकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत समाधान मानले आहे.
श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुका देवी संस्थान मध्ये सुरु असलेल्या गोड बंगाला बाबतीत आपल्या चैनल च्या व फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार डॉ प्रशांत कोरटकर यांनी गत वर्षी मालिकाच सुरू केली होती.ज्याचे 25 भाग त्यांनी सत्तत चालविले.हाती लागलेल्या पुरव्या वरून केवळ बातम्या प्रकाशित करून न थांबता कोरटकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री,महसूलमंत्री,विरोधी पक्ष नेते,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती.मात्र कोविड-19 ची दुसरी लाट पसरल्याने राज्य सरकार ने कुठल्याही बदल्या किरोना काळात करायचा नाही असा शाशन निर्णय निर्गमित केल्याने वरनगावकर यांची बदली होऊ शकली नाही.परंतु दिनांक 17 रोजी त्यांचा बदली चे आदेश झळकले असून त्या आदेशात बदली चा कार्यकाळ जवळ जवळ पूर्ण झाल्याचा व विनंती बदली संदर्भात सुद्धा उल्लेख करण्यात आल्याने वेळे पूर्वी झालेल्या तक्रारी बदली करतांना त्यांचे पंख छाटण्यात आले आहे. बदली आदेशात या सगळ्या बाबी नोंद करून कुठल्याही राजकीय व न्यायालयीन प्रक्रियेला पुढे वरनगाकर यांना जाता येऊ नये म्हणून की काय, बदली चे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा 11 वाजेचा जवळपास निर्गमित करून शनिवार व रविवार सुट्टीचा योग मुद्दाम हून साधण्यात आला आहे.विशेष म्हणजे वरणगावकर यांना सोमवार दिनांक 20 रोजी मध्यान्ह नंतर रुजू होण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.हेच आदेश कार्यमुक्तीचे आदेश असल्याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा असल्याने सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

   रेणुका देवी मंदीरात या पुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही!

श्रीक्षेत्र माहूर ला लुटणाऱ्या भ्रष्ट अधिकारी सिध्देश्वर वरणगांवकर याची अखेर बदली झाली. २०२० मध्ये मी पहिल्यांदा श्रीक्षेत्र माहूर रेणुकादेवी संस्थानात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारा बाबत आवाज उचलला होता. याला खतपानी घालणारा, माहूर येथील तहसिलदार सिध्देश्वर वरणगांवकर याने ५ वर्षा हून अधिक काळ माहूर येथे राहून संस्थान आणि माहूर क्षेत्राला लुबाडले.अगदी निजामशाही चालवली.वरणगांवर बद्दल तक्रार मी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. नागपूर चे काही वरणगांवकरांचे चमचे मला ज्ञान शिकवत होते.की तुम्ही संस्थान ची बदनामी करत आहे. गडकरी साहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवणारे वरनगावकरांचे पाठीराखे यांनी ही श्री रेणुकादेवी संस्थान मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालते.आणि स्वत ला रेणुकेचे भक्त म्हणवतात अशा सर्वांचे डोळे आज उघडले असतील. सिध्देश्वर वरणगांवकर याची बदली माहूर हून करण्यात आली. आहे.एखादा मुद्दा लावून धरून कुठल्याही धमकीला भिक न घालता.आणि कोणत्या ही दबावाला बळी न पडता सर्व साधरण रेणुका भक्ता साठी मी हा आवाज उचलला होता. या साठी. माहूर येथील स्थानिक मित्र मा राज्यपाल मा. उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते यांचे सर्वांचे आभार मानतो. अजून अनेक बदल संस्थान मध्ये लवकरच होणार आहे. जग्गजननी श्री रेणुका देवी मंदीरात या पुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.
डॉ.प्रशांत कोरटकर
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!