घर Exclusive ललिता पंचमीला रेणुका गडावर सांस्कृतिक दरबार न भरल्याने कलावंत मातेच्या शुभाशिषला मुकले!...

ललिता पंचमीला रेणुका गडावर सांस्कृतिक दरबार न भरल्याने कलावंत मातेच्या शुभाशिषला मुकले! अनेक वर्षांची परंपरा खंडित!

माहूर(सरफराज दोसानी):-  ललित पंचमी या दिवसाला कलावंत विश्वात अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या केलेल्या साधने व्दारे अंगीकृत कला श्री चे चरणी अर्पण केल्याने ति साधना सरस्वतीच्या रुपात असलेली देवी भगवती स्वीकारते व आपली कला वृद्धिंगत होते अशी कलावंताची नितांत  श्रद्धा आहे.त्या मुळेच मागील अनेक वर्षापासून अखंडित ललित पंचमीला रेणुका गडावर जागर कार्यक्रमात विविध प्रकारचे अभंग,पदे, भक्तिगीते, गोंधळ, पोवाडा, गवळण, जोगवा, गझल गायन, भारुड, इत्यादीचे गायन दिग्गज कलाकार श्री रेणुकेच्या दरबारात आपल्या कलेचे सादरीकरन करीत असल्याची परंपरा होती.मात्र ही परंपरा यंदा खंडित झाली असून काल दिनांक 10 रोजी ललिता पंचमीला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असताना सांस्कृतिक कार्यक्रम मात्र रद्द असल्याने कलाकारांचा व भाविकांचा हिरमोड झाला.
शारदीय नवरात्र महोत्सवात ललिता पंचमीला श्री जगदंबा माता ताल, सूर, संगीत तथा विविध कलागुणांची मालकीण होऊन कला सादर करणाऱ्या कलावंतांना शुभाशिष देत असते. त्या अनुशंगाने नवरात्र महोत्सवाच्या पर्वावर सायंकाळी ललित पंचमीला रेणुकागडावर कला क्षेत्रातील कलावंत श्री रेणुकामातेच्या दरबारात गायनरूपी हजेरी लावून आपली संगीत सेवा माते च्या चरणी अर्पण करीत असतात.याच कार्यक्रमातून भाविक व रसिक संगीत मेजवानीने तृप्त होत असे.परंतु यंदा नवरात्र उत्सव प्रशासनाच्या अनेक नियमांच्या कचाट्यात सापडल्याने सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.त्या मुळे काल झालेली ललिता पंचमीला संगीत महेफिल सजू शकली नाही.त्या मुळे नेहमी आपली सेवा देवी चरणी अर्पण करणाऱ्या कलावंताचा हिरमोड झाला.वास्तविक ही अनेक वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून भक्ता विना केवळ कलाकारांना निमंत्रित करून ऑनलाईन पद्धतीने ही हा कार्यक्रम पार पडला जाऊ शकला असता.मात्र प्रशासनाने नियमावली जाहीर केली त्यात संस्कुर्तिक कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले.पण ऑनलाईन सेवेचा विचार केला गेला नाही.त्या मुळे भाविकांचे व कलावंतांचे हिरमोड होऊन अनेक काळापासून सुरु असलेली परंपरा ही खंडित झाली.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!