घर Exclusive लखीमपूर घटनेचा माहूर मध्ये निषेध ; भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महाविकास...

लखीमपूर घटनेचा माहूर मध्ये निषेध ; भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचा प्रतित्मक बंद!

माहूर :- लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती,मात्र नवरात्र उत्सव सुरू असल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथे येणाऱ्या हजारो भाविकांना त्रास होऊ नये म्हणून माहूर तालुक्यातील महा विकास आघाडी,मकापा, किसान ब्रिगेड च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र जमून भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकरी बांधवाना वाहनाने चिरडून हत्या केल्या प्रकरणी तीव्र निषेध नोंदविला.व काही काळ वाहतूक रोखून धरली होती.आंदोलकांनी तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन ही दिले.
केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्या सह माकपा व किसान सभेचे कार्यकर्ते शहरातील बस स्थानका समोरील डॉ बाबा साहेब आंबेडकर चौकात शेकडो च्या संख्येने एकत्र जमले होते.या वेळी भाजपा च्या शेतकरी विरोधी व जुलमी कायद्याचा व केंद्र शासनाच्या नीतीचा उपस्थित नेत्यांनी आपल्या मनोगतातून खरपूस समाचार घेतला.या वेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, विनोद राठोड, केजी राठोड,निखिल जाधव, लक्ष्मण बेहेरे,प्रकाश गायकवाड,नावेद खान,राहुल राठोड,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,पंचायत समितीचे उप सभापती उमेश जाधव, पस सदस्य नामदेव कातले, निरधारी जाधव, कॉंग्रेस चे जीप सदस्य तथा तालुकाध्यक्ष संजय राठोड,पंचायत समिती सभापती अनिता विश्वनाथ कदम, नगरसेवक प्रा राजेंद्र केशवे,डॉ.निरंजन केशवे,किसन राठोड,आनंद तूपदाळे,सिद्धार्थ तमागडगे, किसान ब्रिगेड चे अविनाश टनमने,आगा खान, माकपा चे किशोर पवार यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!