घर Crime रक्तरंजित घटनेने उडवला हिवरा परिसरात थरार

रक्तरंजित घटनेने उडवला हिवरा परिसरात थरार

जन्मदात्या पित्यालाच मुलाने धाडले यमसदनी

महागाव ( हरीश कामारकर ) :- मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलाने खाटेच्या ठाव्याने डोक्याला ठेचून बापाला यमसदनी धाडल्याची घटना तालुक्यातील हिवरा संगम येथे आज दिनांक १८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.हिवरा संगम तालुका महागाव येथील सुभाष हरिभाऊ ठाकरे (४०) असे मृत पित्याचे नाव आहे.

घरात असलेला मोबाईल न दिल्याने मुलाचा राग अनावर होऊन लाकडी ठाव्याने वार करून जन्मदात्या पित्याला मुलाने ठार केल्याची घटना तालुक्यातील हिवरा संगम येथे उघडकीस आल्या नंतर गावात एकच खळबळ उडाली.हिवरा येथील रहिवासी सुभाष हरिभाऊ ठाकरे वय (40 ) हे गावातील झोपडपट्टी वसाहतीतील राहतात. त्यांचा अल्पवयीन मुलगा  (अंदाजे वय १७ ) हा नेहमी प्रमाणे घरी आला असता मुलाचा चार्जिंगला लावून असलेला मोबाईल वडीलाने घेतला होता. माझा मोबाईल मला द्या अशी मागणी मुलाने पित्या कडे केली. परंतु वडीलाने मोबाईल न दिल्याने त्याचा राग अनावर झाला, व रागाच्या भरात त्याने घरात असलेल्या बाजेच्या ठाव्याने वडिलां च्या डोक्यावर जोराचे वार केले. त्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळतात मुला ने जवळ असलेल्या परहाटीच्या फासाला प्रेतवर टाकून स्वतःच भडाग्नी देऊन जाळण्याचा प्रयन्त केला. परंतु ऐनवेळी त्याला घरात आगपेटी न सापडल्याने तो आगपेटीसाठी शेजाऱ्यांकडे धावत गेला असता. येन दुपारी मूलाला आगपेटीची काय आवश्यकता आहे असा विचार करत शेजारी असलेला मृतकाचा भाऊ व पुतण्या व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पकडून चितेला जाळण्याचा डाव उधळून लावून त्याला एका झाडाला बांधून ठेवले. या रक्तरंजित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली व सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. सदर घटनेची तक्रार पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी महागाव पोलीस स्टेशन ला देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. व प्रेत उत्तरीय तपासणी करीता सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेचा तपास महागाव येथील पोलीस निरीक्षक दामोदर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, उपनिरीक्षक उमेश भोसले, बिट जमादार रमेश पवार, दीपक रुडे, माणिक पवार, प्रमोद केशवे, गृहरक्षक दलाचे जवान ज्ञानेश्वर देशमुख आदी करत आहेत..


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!