घर Exclusive युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार...

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे…. राज्यावर व देशावर कोरोनाचे आलेले संकट लवकरात लवकर सूटुू दे आणि युवकांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे… असे मागणे आमदार रोहित पवार यांनी श्री रेणुका  माते समोर नतमस्तक होऊन घातले व प्रार्थना केली.
आज दिनांक 18 सोमवार रोजी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी माहुर गडावरील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली.या वेळी त्यांच्या समवेत राज्यातील व जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादी पदाधिकारी व वाई जीप सर्कल चे सदस्य समाधान जाधव,जिल्हा बँक संचालक दिनकर दहिफळे,जिल्हा संघटक नगरसेवक फिरोज दोसानी,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,नगराध्यक्ष शीतल जाधव,बंडू पाटील भुसारे,हाजी उस्मान खान, माजी सभापती मारोती रेकुलवार,युवा नेते कुंदन पवार, प्रा.भगवान राव जोगदंड व अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.
रेणुका माते चे दर्शन व आरती केल्या नंतर आ.रोहित पवार यांचे संस्थान च्या वतीने कोषाध्यक्ष तहसीलदार राकेश गिड्डे,विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,शुभम भोपी यांनी त्यांचा सत्कार केला.त्या नंतर रोहित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक्याचा, समानतेचा प्रतिक भगवा स्वराज्य ध्वज ज्या ठीकानी गेला होता,त्या त्या प्रेरणास्थानाला भेट देऊन आभार व आशीर्वाद दौऱ्याच्या निमित्ताने माहूर गडावर आलो असल्याचे सांगत मंदिरात राजकीय भूमिका मांडणे योग्य नसल्याचे सांगितले.मात्र स्वबळावर की एकत्र या विषयी तिन्ही पक्षातील मोठे नेते निर्णय घेतील, त्यानंतर स्थानिक नेते त्या परिसरातील त्या ठिकाणी असलेली परिस्थिती च्या अनुषंगाने एकत्र यायचे कि,स्वबळावर लढायचे याचा अभ्यास करून सगळे निर्णय घेतील. आत्ताच या बाबत बोलणे घाईचे ठरेल असे म्हणून राजकीय विषयावर अधिक बोलायचे त्यांनी टाळले.या वेळी अनिल कऱ्हाले, अजित साबळे, रोहिदास राठोड, मनोज कीर्तने,महेश तंबाखू वाला, विनोद राठोड,अमजद पठाण,कैलास बेहेरे,संदीप सिद्धेवार, लक्ष्मण बेहेरे,इंदल पवार,अमित येवतीकर,राजू चव्हाण,अभिजित राठोड,अमजद गोंडवडसा,तौफिक शेख,लक्ष्मण घुले,अभिजित पापलवाडी, के.जी.राठोड,दिनेश पवार,जीवन राठोड, यांच्या सह अनेकांची उपस्थित होती.दर्शनानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवनाला भेट दिली त्या ठिकाणी समाधान जाधव यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.त्या नंतर ते पुढील नियोजित नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!