घर Breaking news मृत्यू चा सापळा बनलेल्या धनोडा - माहूर रस्त्या च्या दुरुस्ती...

मृत्यू चा सापळा बनलेल्या धनोडा – माहूर रस्त्या च्या दुरुस्ती कडे महामार्गाची तर दत्त शिखर – दत्त मांजरी रस्त्या कडे जिल्हा परिषदे ची पाठ!

माहूर:- मागील दीड वर्षापासून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते  याचा शोध न लागलेल्या वाहनधारकांना नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरी धनोडा   – माहूर या घाटातील रस्त्याची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती,मात्र महामार्ग विभागाने जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावून जबाबदारी झटक्यामुळे सदर मार्गावर वाहन चालवणे तारावरची कसरत ठरत असून माहूर गडावर येणारे भाविक छे…छे हे रस्ते म्हणून सबंधित  विभागा सह या विभागातील लोकप्रतिनिधींना दोष देत परतीचा प्रवास करीत आहे.
धनोडा माहूर किनवट भोकर या राज्य महाराजांची राष्ट्रीय राज्यमार्ग आत रूपांतर झाल्यापासून सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कासव गती बांधकामामुळे मागील तीन वर्षापासून नागरिकांच्या नाकी नऊ आले आहे. अनेकांना या मुळे आपल्या जीवालाही मुकावे लागले असून शेकडो अपघातांची नोंद तीन वर्षाच्या कालावधीत झाली असताना महामार्ग विभाग गेंड्याची कातडी पांघरून आहे.लोकप्रतिनिधी सह सत्ताधारी व विरोधक गांधारी च्या भूमिकेत असल्याने ग्रामीण भागासह माहूर शहरातील रस्ते सुद्धा अर्धवट अवस्थेत व खोदून ठेवलेले आहे. या निर्माण कार्यात नागरिकांना होणारा त्रास व वेळोवेळी होणारे छोटे-मोठे अपघात पाहता महामार्गापेक्षा राज्य मार्गच बरे होते असे म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.
नवरात्राच्या निमित्ताने दत्तशिखर अनुसया, दत्तमांजरी या जिल्हा परिषदेच्या हद्दीतील रस्त्याचा विषय ही जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत चर्च विला गेला होता.मात्र जिल्हा परिषदेच्या अभियंता ने आमच्या कडे निधीच उपलब्ध नसल्याचे सांगत काखा वरी केल्या. परिणामी तो ही रस्ता खड्यात असून नागरिकांना व यात्रे करुणा वाट शोधावी लागत आहे.जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासना कडे दोन्ही विभागाने पाठ फिरवल्याने जिल्हाधिकारी पुन्हा या बाबतीत मागोवा घेतील का हा सवाल अनुत्तरित असला तरी नागरिकांचा व वाहन चालकांच्या यातना मात्र सुरूच असून माहूर तालुका वाशियांचा रस्त्याचा वनवास कधी संपेल हा मोठा यक्ष प्रश्न आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!