घर Exclusive माहूर येथे पथनाट्याव्दारे कायदेविषयक जनजागृती;नवरात्रानिमित्य कायदेविषयक जनजागृती कक्ष स्थापन!

माहूर येथे पथनाट्याव्दारे कायदेविषयक जनजागृती;नवरात्रानिमित्य कायदेविषयक जनजागृती कक्ष स्थापन!

माहूर :नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने माहूर तालुका विधी सेवा समिती व पंचायत समिती माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्य  दि. ०८ रोजी माहूर शहरात टी पॉइंट येथे पथनाटयाव्दारे कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. नांदेड चे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांच्या उपस्थितीत पथनाट्याव्दारे कायदेविषयक जनजागृती कक्षा मार्फत कायदेविषयक माहितीचे पत्रके वाटप करण्यात आली.
या पथनाटयामध्ये हुंडाबळी, बालरोजगार, बलात्कार, बालविवाह, छेडछाड, स्त्री पुरुष समानता या ज्वलंत विषयावर जनजागृती करण्यात आली. या पथनाटयामध्ये रेणुकादेवी महाविद्यालय माहूर येथील विद्यार्थी साक्षी जोशी, कु.आरती कुलकर्णी, शिवानी एकाळे, पल्लवी आखरे,प्रीती अडवाल, श्रद्धा पानोडे, वैभव आखरे, ओमकार गायकवाड, पवन घोगरे आदीनी सहभाग घेतला.ढोलकीची साथ संगत अशोक दवणे यांनी तर हार्मोनियम वादन व गायन प्रकाश मुनेश्वर यांनी केले.  पथनाट्य पथकाचे  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी कौतुक करून बक्षीस दिले. माहूर टी पॉइंट येथे कायदेविषयक जनजागृती कक्ष स्थापन करून  नांदेड चे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांच्या  हस्ते कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माहूर  दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पवनकुमार तापडिया, माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे  सहाय्यक सरकारी अभिवक्ता डी.एस.भारती, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, अॅड. श्याम गावंडे, माहूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.एस.एस.कांबळे, प्राचार्य जगमोहन रेड्डी, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लोणे,प्रा.बाबसाहेब राठोड, डॉ.धरमसिंग जाधव, अॅड सि.एम.राठोड, अॅड ए.एम.ढगे, अॅड. डी.आर.मेहता,अॅड. जगदिश अडकीने, अॅड.विशाल भवरे, अॅड. विशाल चव्हाण, अॅड पवन ठेपेकर,अँड.नितेश बनसोडे अॅड. सायली कपाटे, पथनाट्याचे लेखक व दिग्दर्शक प्रा.विनोद कांबळे हे उपस्थित होते.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!