घर Exclusive माहूर येथील चित्रकार रणजित वर्मा यांचे मुंबई येथे चित्रप्रदर्शन....!!!

माहूर येथील चित्रकार रणजित वर्मा यांचे मुंबई येथे चित्रप्रदर्शन….!!!

माहूर:- येथील सुप्रसिद्ध चित्रकार रणजित दत्त वर्मा यांचे नेहरू आर्ट सेंटर,मुंबई येथे “8 आर्टिस्ट” या नावाचे चित्रप्रदर्शन दि.21सप्टेंबर ते दि. 27 सप्टेंबर 2021 दरम्यान होत असून यात देश विदेशातील नामवंत अशा आठ चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येत आहेत.या प्रदर्शनात रणजित वर्मा (नांदेड), भानू गोवाती(बंगळूर),प्रकाश जाधव (मुंबई),गोपाल ढवळे (नागपूर), मनिषराव (दिल्ली) ,स्वाती द्रविड(इंदौर), मोना राठोड(ओमान), शिल्पा राठोड(मुंबई) या जगप्रसिद्ध आठ चित्रकारांच्या कलाकृतींचा सहभाग आहे. 
या चित्रप्रदर्शनासाठी ‘नेशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन’च्या संचालिका ‘किरण बेदी’ व डाॅ.दिपांकर राॅय  (द ग्लोबल कन्व्हेनर ॲन्ड चेअरमन  इंटरनॅशनल आर्ट एक्ट्स) यांनी प्रोत्साहन देऊन या प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी स्विकारत शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच या प्रदर्शनातील चित्र विक्री ची रक्कम ब्रेस्ट कॅन्सर पिडीतांना दिली जाणार हा उदात्त हेतू ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन चित्रकार रणजित दत्त वर्मा यांनी प्रतिनिधींशी बोलताना केले.चित्रकार रणजित दत्त वर्मा यांनी 2018 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या लोकांसाठी कोल्हापूर पुरग्रस्थांसाठी मदतीसाठी च्या चित्रप्रदर्शनात आपली कलाकृती देऊन पुरग्रस्थांसाठी मदत पुरवली होती.सामाजिक जाणिव जपणाऱ्या रणजित वर्मा यांची यापूर्वी ही देश आणि विदेशात अनेक चित्रप्रदर्शने झाली आहेत.त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माहूर सारख्या दुर्गम भागातून त्यांचा कलाप्रवास थक्क करणारा असून त्यांच्या या यशाचे तहसीलदार राजेश गिड्डे, गट विकास अधिकारी युवराज म्हैत्रे,अ.भा.पत्रकार संघ माहूर तालुकाध्यक्ष सर्फराज दोसानी,शिक्षक जितेंद्र वर्मा, जेष्ठ पत्रकार नंदु संतान, पुरोगामी शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील, कवी मिलिंद कंधारे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, कवी मिलिंद जाधव,डॉ.सुरज सुर्यवंशी, बालाजी उबाळे, जितेंद्र माकोडे,दिलीप दारव्हेकर, चंद्रकांत पोतदार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!