घर Breaking news माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग शोधायचा कुठे? महामार्ग विभाग बेफिकर; वाहन चालकांचे...

माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग शोधायचा कुठे? महामार्ग विभाग बेफिकर; वाहन चालकांचे मात्र हाल!

माहूर:- तालुक्यात सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक निर्माण कार्य असे एक ना अनेक योजना रस्त्याच्या विकासासाठी कार्यरत आहे,मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था दैनिय आहे.त्यात धानोडा – माहूर – किनवट या राष्ट्रीय मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे व अर्धवट कामामुळे राष्ट्रीय महामार्ग शोधायचा कुठे असा प्रश्न नागरीकातून विचारला जात आहे.
माहूर तालुक्यातील रस्ते सबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने निर्माण कार्य संपे पर्यंतच रस्ते उखडायला सुरवात होते, रस्त्यावर थातूरमातूर कामे केली जात असल्याचे रस्ता लवकरच उखडला जाते. रस्त्याच्या बाबतीत राज्यात नेहमी मागे राहिलेल्या माहूर तालुक्याला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी तीर्थक्षेत्राला जोडण्यासाठी माहूर कडे येणाऱ्या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन तुळजापूर बुटीबोरी महामार्गाला जोडले.महामार्ग विभागा मार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने किनवट माहूर तालुक्यातील प्रमुख रस्ते चकाचक होतील अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती.मात्र भलतेच झाले,ज्या ठेकेदाराला भोकर किनवट माहूर महामार्गाचे काम मिळाले आहे, त्यांनी मागील दोन वर्षां पासून ते काम कासवगतीने चालवले असल्याने नागरिकांसाठी रस्ते जीवावर बेतनारे झाले आहे.अनेक अपघात होऊन लोक मृत्यू मुखी पडले तरी सत्ताधारी, विरोधक, सामजिक संघटना किवा राजकीय पक्षाच्या एकही कार्यकर्त्याने या रस्त्याचे काम लवकर मार्गी लागावे म्हणून ना आंदोलने केली ना मोर्चे काढले.केवळ माध्यमांच्या प्रतिनिधी नी हा मुद्दा वारंवार लाऊन धरला मात्र कुंपणच शेत खात असल्याने दादा मागावी कुणाकडे अशी परिस्थिती निर्माण होऊन तिसऱ्या वर्षी ही निर्मानाधीन रस्ते अर्धवटच आहे.
विशेष म्हणजे महामार्गाचे अधिकारी त्यांचे कार्यालय नांदेड ला असल्याने त्या ठिकाणावरून उंटावर शेळ्या हकतात. तीन वर्षात एका बाजूचा ही रस्ता पूर्ण झालेला नाही.ना.गडकरी यांनी श्री रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना असुविधा होऊ नये म्हणून तुळजापूर – माहूर ही दोन शक्ती पिठे महामार्गा ने जोडली.मात्र त्या रस्त्याची गुत्तेदाराणी व सबंधित विभागाने वाट लावली आहे.याला लोकप्रतिनिधी जबाबदार असून खा.हमेंत पाटील यांनी लोकसभेत तर आमदार भिमराव केराम यांनी विधानसभेत या अतिशय संत गती ने होणाऱ्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!