घर कोरोना माहूर तालुक्यातील एकाचा समवेश ; नांदेड मध्ये आणखी चार पॉझिटिव्ह; एकूण संख्या...

माहूर तालुक्यातील एकाचा समवेश ; नांदेड मध्ये आणखी चार पॉझिटिव्ह; एकूण संख्या 44

 

माहूर :- आज दिनांक 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता आलेले 4 ही अहवाल पॉझिटिव्ह आले असून नांदेड मध्ये पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या एकूण 44 वर पोहचली आहे.

प्राप्त 4 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नांदेड शहरातील 3 रुग्णाचा समावेश असून यात 14 वर्षीय दोन पुरुष आणि एक महिला वय वर्ष 32 हे 3 मे रोजी रहमत नगर नांदेड येथील कोरोना बधित मृत महिलेच्या नजीकच्या संपर्कातील आहे.सदर रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच माहूरच्या कोविंड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेल्या एक 64 वर्षीय पुरुषाचा स्वॅप तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सदर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आज प्राप्त 4 अहवाला मुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित पॉझिटिव रुग्णांची संख्या 44 झाली आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली.
शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची वाढत चालली असून माहुरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला,तो बाहेरुन आला होता का किंवा अगोदरच्या कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीया तील तो व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित केले जात आहे.तालुक्यातील
मालवाडा येथील 64 वर्षीय पुरुष जो कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होता त्याचे काल शुक्रवारी स्वॅप तपासणी साठी पाठविले होते.त्याचा अहवाल आज पॉझिटिव आला आहे.


माहूर तालुक्यातील मालवाडा येथील पॉझिटिव्ह रुग्ण हा उमरखेड तालुक्यातील धानोरा येथून दिनांक 6 रोजी मालवाडा येथे आला होता, त्याला सात रोजी 11:45 वाजता माहूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये तपासणीसाठी दोन नातेवाईकांनी आणले होते.काल दिनांक 8 रोजी सदर रुग्णाचा स्वॅप तपासणी साठी पाठविण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाचा संपर्कातील दोन नातेवाईक व कोविड केअर सेंटर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना काही वेळातच क्वारंटाईन करणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली आहे.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!