घर Breaking news माहूर च्या भोंदु बाबांचा पर्दाफाश झाल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्न आले समोर! ...

माहूर च्या भोंदु बाबांचा पर्दाफाश झाल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्न आले समोर! उच्चशिक्षित लोक आंध्रश्रद्धेचे बळी पडतात तेव्हा…..

माहूर (सरफराज दोसानी) संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदासांनीही समाजाला ढोंगी बुवांच्या नादाला लागू नका, फसू नका असे टाहो फोडून सांगितले. पण, बुवाबाजीचा भारतीय समाजाला लागलेला रोग काही बरा झाला नाही. भारत देशात संतांनी धर्माच्या माध्यमातून मानवतेचा व करुणेचा मार्ग सांगितला व कृतिशील आचरून दाखवला. माणसांना आपल्या भजनी लावणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज,मौलवी, हे संत साहित्याचा वापर आपल्या सोईसाठी करतात; मात्र मुखातून संतांच्या शब्दांचा कोरडा उद्‌घोष करणारी ही मंडळी प्रत्यक्ष वर्तनात कमालीची मतलबी असतात असे दिसते. काल जग प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देवभूमी माहूर मध्ये एका भोंदूबाबाचा अनिस ने दिलेल्या तक्रारी नंतर भांडाफोड झाला,मात्र यातील पिढीत ज्याला बाबाने विविध अमिषे देऊन ठगले आहे, तो माया नागरी मुंबईचा उच्च विद्या विभूषित तरुण असल्याने माहूर सारख्या आदिवासी दुर्गम भागातील अशिक्षित, अनपड, ग्रामीण भागातील किती लोक अंधश्रद्धेचे बळी पडत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. भोंदू बाबाच्या पर्दाफाश झाल्या नंतर उच्चशिक्षित लोक आंध्रश्रद्धेचे बळी पडतात तेव्हा…..अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
20 व्या-21 व्या शतकात सुशिक्षितांची संख्या वाढली. विज्ञान युगाने भौतिक सोयी-सुविधा वाढल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार झाला.असला तरी माणसे धार्मिक प्रवृत्तीची असल्यामुळे बुवाबाजीच्या मागे लागतात हे 23 लाखांचा गंडा घालणाऱ्या बाबांच्या व त्यांच्या अघोरी विद्ये वर अंधभक्ती ने पछाडलेल्या पेश्याने अभियंता असलेल्या भक्ताच्या झालेल्या छाडावरून दिसून येते.एखाद्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टीवर खात्री न करुन घेता,तर्क वितर्क बाजूला ठेवून आंधळेपणाने विश्वास ठेवणे. बुवाबाजी, चमत्कार, जादूटोणा, करणी, नरबळी यासारख्या विकृतीवर मनमोकळेपणाने विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा असे नाव देण्यात आले आहे.याच अंधश्रद्धेचा गोरख धंदा बुवाबाजी करणारे चालवतात.माहूर परिसरात असे किती तरी अनधिकृत मठ आहेत ज्यांची कुठेच नोंद नाही.मागील महिन्यातच गायारांन जमिनीवर अतिक्रमण करून माठ ठलेल्या दोन महाराजांचे अनधिकृत मठ पोलिसांच्या उपस्थित मध्ये जमिनोधस्त करण्यात आले होते,त्या वेळी काही आक्षेपार्ह वस्तू त्या ठिकाणी महसूल पोलीस व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले होते. वनविभाग व महसूल प्रशासनाच्या जागेत अजूनही काही अनधिकृत मठे आहेत. काल गजाड झालेल्या भोंदू कपिले बाबाचा मठ सुद्धा अनाधिकृत होता,एका संस्थांनच्या मालकी च्या जागेवर त्यांनी आपला डेरा जमविला होता असे कळते. अंधश्रद्धा निर्मूलन समिति आपल्या परीने प्रत्येक ठिकाणी काम करीत असले तरी त्यांना पिढीत व्यक्ती कडून जोपर्यंत माहिती मिळत नाही तो पर्यंत ते ही अनभिज्ञ असतात. अशा समाज घातकी भोंदू बाबांचा शोध घेण्यासाठी माहुर किनवट या आदिवासी तालुक्यात सर्च ऑपरेशन चालविणे अत्यंत गरजेचे आहे.कारण या पूर्वी ही या तालुक्यात खांबाळा येथे सोना माता अवतरली होती,तर गोंडवडसा येथे वंश प्राप्ती साठी गुलाबाचा फुल,उंबराचे फळ, पाने,व पाणी देणारा बाबा उदयास आला होता.समाजातील जागरुक नागरिकांनी पोलिसात तक्रार देऊन त्यांना पळवून लावलें होते.अनेक गंभीर गुन्हे ही त्या वेळी माहूर पोलिसात नोंद करण्यात आली होते. मात्र होळीची बोंब चार दिवस या प्रमाणे काही दिवस बुवाबाजी चा गोरख धंदा बंद होता.पुन्हा या परिसरातील अशिक्षित नागरिकांचा फायदा घेत श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धेचे बीज पेरून अनधिकृत मठ अस्तित्वात येत आहे.अंधश्रद्धेचा समूळ नष्ट करण्यासाठी शासन स्तरावर तसेच विविध सामाजिक सेवाभावी संस्थामार्फत, विविध समाज प्रबोधन कार्यक्रमांमार्फत जनजागृती सातत्याने केली जात आहे. तरी देखील अजूनही अंधश्रद्धा समाजात फोफावत असेल तर शासनाने अशा मांत्रिकांवर,बुवा बाबांवर अशा प्रवृत्तींवर कडक कार्यवाही करुन माहूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धा मुक्त करावा हीच अपेक्षा.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!