घर Breaking news माहूर गडासह नांदेड जिल्ह्यातील धार्मिक व संवेदनशील ठिकाणी ड्रोन द्वारे व्हिडीओ...

माहूर गडासह नांदेड जिल्ह्यातील धार्मिक व संवेदनशील ठिकाणी ड्रोन द्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नांदेड:- संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक  असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, आस्थापना, मंदिरे व महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड, दुरदर्शन केंद्र राजेंद्र नगर किनवट अ वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड ब वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा नांदेड यांचा समावेश आहे.ब वर्गवारीतील आस्थापना – श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड, रेल्वे स्टेशन नांदेड,  पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड, डी मार्ट कॅनालरोड नांदेड
महत्वाची धार्मिक स्थळे – सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर संस्थान , दत्तशिखर मंदिर , संस्थान माहुर ता.माहुर जि.नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू  करण्यात आले आहे.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!