घर Exclusive महामार्ग खड्यात बुडाल्याने गणेश मंडळाला विसर्जनासाठी करावा लागला सहा किमी चा फेरा!...

महामार्ग खड्यात बुडाल्याने गणेश मंडळाला विसर्जनासाठी करावा लागला सहा किमी चा फेरा! निबंधांचे पालन; गणरायाचे विसर्जन शांततेत!

माहूर:- ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करत माहूर शहरातील विविध मंडळ आणि घरगुती गणरायांचे भक्तीमय वातावरणात काल दिनांक 20 सोमवार रोजी विसर्जन करण्यात आले.निर्बंधाचे पालन करत विसर्जन शांततेत झाले असले तरी महामार्गाचा धानोडा – माहूर हा पैनगंगा नदीचा रस्ता पूर्णतः खड्यात बुडाल्याने गणेश मंडळांनी मंगल मूर्ती ची काळजी घेत लांजी मार्गे वळण रस्त्याची वाट धरून 6 किमी फेरा करत पैनगंगा नदीत शहरातील एकूण 13 मंडळांनी विसर्जन केले.मिरवणुकीला परवानगी नसल्याने यावर्षी साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले.
या वर्षी सुद्धा कोरोनाचे सावट असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा असल्याने माहूर शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व वार्डातील गणेश भक्तांनी सकाळी गणरायाची आरती करून मनोभावे पूजा केली, त्यानंतर जड अंतकरणाने ना ढोल ताशा पथक,ना मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला भक्तीपूर्ण वातावरणात शांततेत निरोप दिला.कोरोना संसर्गामुळे शासनाने आदेशीत केलेल्या नियमांची पायमल्ली गणेश विसर्जनाच्या वेळी होऊ नये म्हणून माहूर उप विभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव,पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव रिठे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार,पो शरद घोडके, विठल जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी राकेश गिड्डे, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक,सुनील वाघ, दळवे, देविदास सिदाम, गणेश जाधव, अविनाश रुणवाल, विजय शिंदे,याच्या सह इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
 गणेश मंडळांना नाहक त्रास
माहूर शहरातील गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन हे लगत च्या पैनगंगा नदित करण्याची परंपरा आहे.गत वर्षी कोरोना मोठ्या प्रमाणात आतंक माचवित असल्याने नगर पंचायतीने मूर्ती संकलन करून विसर्जन केले होते,यंदा मात्र गणेश मंडळांनी आपल्या वाहनातून मंगल मूर्ती नदी वर विसर्जनासाठी नेली.दरम्यान नदीवर जाण्यासाठी महामार्गाचा मुख्य रस्ता अतिशय दैनिय अवस्थेत असल्याने मंडळांना लांजी मार्गे वळण रस्त्याची वाट धरून 6 किमी फेरा करत पैनगंगा नदी वर पोहचावे लागले.त्या मुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.मात्र याची महामार्ग विभागाला ना लाज ना खंत.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!