घर Breaking news भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच!...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त!

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८ सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आयुर्वेदिक उपचाराच्या नावाने एका रुग्णाच्या मजबुरीचा फायदा उचलत दैवी शक्ती आपल्याला प्रदान असल्याचे भासवून रक्ताने होम हवणाचा विधी अघोरी प्रयोग करत भक्तांना लुबाडणाऱ्या माहूर येथील विश्वजीत रामचंद्र कपीले या भोंदू बाबा सह अन्य तिघा विरूद्ध २३ लक्ष रुपयाची फसवणूक झालेल्या एका भक्ताच्या तक्रारी वरून माहूर पोलिसात दिनांक १३ रोजी रात्री  फसवणुकी सह महाराष्ट्र नरबळी व ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या तील आरोपीला आज सोमवार पर्यंत ची पोलीस कोठडी न्यायायलायाने सुनावली होती.दरम्यान च्या ५ दिवसाच्या पोलीस कोठडीत माहूर पोलिसांना अनेक पुरावे हाती लागले आहे.पोलिसांनी तपासात
२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या गंभीर प्रकरणात पोलिस निरीक्षक नामदेव रिठे, सहाय्यक,पोलिस निरीक्षक संजय पवार, प्रकाश देशमुख, विजय आडे यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी कपिले बाबा यांच्या पुसद जि. यवतमाळ येथील निवासस्थानावरून एक चारचाकी कार, दोन मोबाईल, लॅपटॉप, एक फ्रिज,लखमापूर येथून वेल्डिंग मशिन, हॅमर मशिन यासह इतर २ लाख ८६ हजार रूपयांचा मुद्देमाल व जिवंत कासव,अंगारा ही जप्त केला आहे.या प्रकरणातील एक महिला आरोपी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहे.तिला अटक झाल्या नंतर अजून काही आरोपी वाढू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर जिवंत कसाव पोलिसांनी जप्त केल्याने वन कायद्या नुसार गुन्ह्यात वाढ करावी अशी मागणी अनिस चे कार्यकर्ते मनोज कीर्तने यांनी केली आहे.
——- अशी उघडकीस आली घटना —- 
शहरापासून जवळच जागमाता कुंडाशेजारी भोदू बाबा कपिले याने आश्रम ठाटला होता. तो अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास होता. त्यांना देवीशक्ती प्राप्त असल्याचे त्यांचे चेले- चपाटे लोकांना भासवत व दैवीशक्तीच्या प्रकोपाची भिती दाखवून ‘माया’ गोळा करण्याचा गोरखधंदा केला. यात अभियंता प्रविण निवृत्ती शेरकर रा. कोपरगाव डोंबिवली ठाणे यांची २३ लाख रुपयांची फसवणूक झाली.२०१३ ते २०२१ पर्यंत भक्ताची आर्थिक लूट झाल्याचे प्रकरण अनिस ने रेटून धरल्या नंतर सदर प्रकरणात १३ ऑक्टोबर रोजी पिढीत भक्ताने फिर्यादी वरून भोंदू बाबा चा पर्दाफास झाला.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!