घर Breaking news बलात्कार प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी!

बलात्कार प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी!

माहूर:- मनाविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन जिवानिशी मारुन टाकीन अशी धमकी देणाऱ्या देवानंद गणेशसिंह डोबवाल रा.लांजी याच्या विरोधात माहूर पोलीस ठाण्यात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार पीडित महिला ने दिनांक १९ रोजी दिलेल्या अर्जा वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीस अटक करून न्यायालयात उभे केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
माहूर शहरातील पीडित   अन्यायग्रस्त महिलेने दिलेल्या फिर्यादीत मी माहूर येथील रहिवासी असून रोज मजुरी करुन उदरनिर्वाह करते. माझ्या पतीचा मित्र देवानंद गणेशसिंह डोबवाल हा माझ्या पतीसोबत नेहमीच घरी येत असल्याने माझी ओळख त्याचा सोबत झाली होती. दिनाक ९ नव्हेंबर २० रोजी माझ्या पतीचे निधन झाले असल्याने डोबवाल हा माझे सांत्वन करण्यासाठी घरी येत होता.व शारीरिक सुखाची मागणी करीत होता.मात्र मी नकार दिला म्हणून मला जिवानिशी मारुन टाकीन अशी धमकी ही दिली. मी बदनामीच्या भीतीपोटी ही बाब कूणालाही सांगीतली नाही, त्यांने परत १० दिवसानी घरी येऊन मला धाकदडप करुन रात्री साडेबारा वाजता माझ्या मनाविरुध्द जबरदस्तीने माझेसोबत संभोग केला ही घटणा कुणाला सांगितली तर मांगाची औलाद तिला खतम करून टाकीन अशी धमकी दिल्याने मी घाबरून याबाबत काहीच सांगीतले नाही. तेंव्हापासून देवानंद वारंवार घरी येउन माझ्यासोबत जबरी संभोग करू लागला१० मे रोजी घरी येऊन माझ्या सोबत जबरी संभोग केला बदनामीच्या भीतीने मी कूणालाच सांगितले नाही परंतू त्याचा त्रास असह्य झाल्याने मी आज दिनांक १९ मे रोजी तक्रार दाखल केली असून देवानंद गणेशसिंह डोबवाल याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेने केल्या वरून माहूर पोलिसांनी आरोपी विरूद्ध बलात्कार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे व इतर कालमानानुसार गून्हा दाखल करून आरोपीस अटक केली.आरोपीला न्यालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी विलास जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रीठे हे अधिक तपास करीत आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!