घर Exclusive बदली झालेल्या तहसीलदार वरणगावकरचा निरोप समारंभ बनला चर्चेचा विषय; एकीकडे निरोप तर दुसरीकडे...

बदली झालेल्या तहसीलदार वरणगावकरचा निरोप समारंभ बनला चर्चेचा विषय; एकीकडे निरोप तर दुसरीकडे बदलीचा आनंदोत्सवात फटाक्याची आतषबाजी !

माहूर(जयकुमार अडकिने)- गेल्या कित्येक वर्षाची माहूर तालुक्यात नौकरी करून बदली झालेल्या अधिकाऱ्यास आदरयुक्त भावनेने त्याने तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करीत पुढील कारकीर्दिस शुभेच्छा देऊन निरोप देण्याची माहूरची परंपरा वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या निरोप समारंभात मोडीत निघाली असून हा निरोप समारंभ माहूर तालुक्यात उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे.

माहूर येथे अंदाजे सात वर्षापूर्वी नायब तहसीलदार पदावर रुजू होऊन नंतर येथील बदली झालेल्या तहसीलदाराच्या रिक्त पदावर प्रभारी नियुक्ती मिळवून त्यानंतर माहूर येथे नियुक्ती झालेल्या ५ तहसीलदारांच्या मंत्रालयातील लागेबांधे वापरून रद्द करवून घेत उदभवलेल्या स्थिती व तांत्रिक बाबीचा फायदा घेत तहसीलदार पदावर नियुक्ती करवून घेतली.पदोन्नतीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिने बदली करून पदोन्नती नंतर पुन्हा माहूरलाच रुजू होऊन माहूर येथे एकाधिकारशाही व हुकुमशाही गाजविणाऱ्या माहूरच्या वादग्रस्त तहसीलदार वरणगावकर यांना आपल्या विरुद्ध महाविकास आघाडी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी सादर केल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली बदली होणारच या अनुषंगाने मंत्रालयातील लागेबांध्याचा फायदा घेत वैद्यकीय कारण पुढे करून विनंती बदलीची मागणी अर्ज सादर करून आपल्या गावानजीक संग्रामपुर जि.बुलडाना येथे बदली करवून घेतली. दि.१७ रोजी बदलीचे आदेश धडकल्याने माहूर तालुक्यात शासनाच्या या आदेशाचे सर्वस्तरातून जोरदार स्वागत झाल्यामुळे हा निरोप समारंभ माहूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.वादग्रस्त तहसीलदाराच्या बदलीने झालेल्या काही प्रमाणात नाराज झालेल्या काहीनी दि.२० रोजी सायंकाळी ७ वाजता जगदंबा धर्मशाळेत भव्य दिव्य निरोप समारंभाचे आयोजन केले. १०० खुर्च्याची व्यवस्था करून उरली सुरली इभ्रत वाचविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला होता. परंतु काही ब्रम्हवृंद,एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व आयोजक मंडळीचे काही हस्तक वगळता कुणीही या निरोप समारंभाला हजेरी लावली नाही.तर कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना,मनसे,एमआयएम,प्रहार जनशक्ती, वंचित बहुजन आघाडी,गोर सेना,संभाजी ब्रिगेड व इतर कुणीही सामाजिक कार्यकर्ते यांनी या निरोप समारंभाकडे पाठ फिरविल्याने अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे शहरातील काही कार्यकर्त्यांनी निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळेचे नियोजन साधून शहरात बदलीचा आनंदोत्सव साजरा केल्याचे दिसून आले.त्या फटाक्यांची आतिषबाजी चे फोटो सुद्धा समाज माध्यमावर वायरल करण्यात आले.

सात वर्ष माहूर शहरात प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याच्या झालेल्या बदलीनंतरच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एकीकडे निरोप समारंभ तर दुसरीकडे बदली झाल्याचा आनंदोत्सवात फटाक्याची आतषबाजी व तालुक्यातील भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निरोप समारंभास पाठ फिरविणे हे नेमके कशाचे द्योतक आहे.याची तालुकाभर सुरस चर्चा होत असून वादग्रस्त तहसीलदार वरणगावकर यांनी त्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित डोकी मोजून असे का ? याचे आत्मपरीक्षण करून बदली झालेल्या ठिकाणी तरी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा असे माहूर तालुक्यातील जेष्ठ नागरिक व जाणकार नागरीकामधून प्रतिक्रिया येत आहेत.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!