घर Breaking news प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या आक्रमक!

प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या आक्रमक!

माहूर:- भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.माहूर येथे ही दरेकरांवर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडी कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती.त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला कार्यकर्ता चांगलेच आक्रमक झाले असून दरेकरांचे वक्तव्य म्हणजे संपूर्ण महिलांचा अपमान असल्याने दरेकर यांनी विना विलंब माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्या वर महिलांना अपमानित केल्या संदर्भात कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष वनिता जोगदंड,राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा तथा नगराध्यक्षा शीतल जाधव,जिल्हा सरचिटणीस नम्रता कीर्तने,नगर सेविका शकीला बी, निर्मला बाई पवार, अरूणा श्रीराम वार, विजया ताई मुळे,जयश्री चव्हाण,यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या संस्कृती चे दर्शन घडविणारे असून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.संघाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेल्या दरेकर यांना प्रसिद्धी ची नशा चढली असुन,त्या मुळे झिन्गलेल्या नशेतुन अशी बेताल बडबड करत आहे.हा समस्त जिजाऊ ,सावित्री,रमाई च्या लढाऊ लेकीचा अपमान आहे .दरेकर यांनी वाचाळ विराने विनाविलंब माफी मागितली नाही तर प्रामुख्याने राष्ट्रवादी महिला आघाडी च्या रोषाला सामोरे जावे लागेल .
नम्रता किर्तने .
जिल्हा सरचिटणीस , 
महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!