घर Breaking news पेढा प्रसाद विक्रेत्यां च्या सामाना सह पैसे व जेवणाचे डब्बे ही केले...

पेढा प्रसाद विक्रेत्यां च्या सामाना सह पैसे व जेवणाचे डब्बे ही केले श्री रेणुकादेवी प्रशासनाने जप्त;मंदिर पायऱ्या वरील दुकानदारांनी मांडली खा.हेमंत पटलांकडे व्यथा!

माहूर:- माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या पेढा मिठाई व कुंकू ची १३ दुकाने रेणुका देवी संस्थान चे कार्यालय अधीक्षक साबळे यांनी सूचना न देता उठवून टाकत त्या ठिकाणचा मुद्देमाल व रोख रक्कम आणि जेवणाचे डब्बे ही जप्त केले. हातावर पोट असलेल्या लघु व्यापाऱ्यांचे त्या मुळे प्रचंड नुकसान झाले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. 
माहूर गढावर नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने शांततेत साजरा होत असून शासणाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करत भाविकही प्रतिसाद देत आहे.  नवरात्रोत्सव म्हणजे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी बांधवां साठी दिवाळीच असते. आदेशांचे पालन करत व्यापारी भाविकांच्या गरजा पूर्ण करत असताना काळाचा अचानक आघात झाल्याप्रमाणे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या पेढा मिठाई व कुंकू ची १३ दुकाने देवस्थान चे कार्यालय अधीक्षक साबळे यांनी सूचना न देता उठवून टाकल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.गेल्या दोन वर्षांपासून यात्रा महोत्सव बंद असल्याने व्यापारी हवालदिल, कर्जबाजारी झाले इतर व्यवसाय करता येत नाही, आणि मंदिर बंद अशी अवस्था झाली. त्यातच शासनाने मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांनी उधार,उसनवारी तून सामान भरून दुकाने सजविली होती. नवरात्रोत्सव सुरू होऊन ५ दिवस झाल्यानंतर मंदिर प्रशासनाचे बंद असलेले डोळे उघडून हजार दोन हजार रुपयांचा व्यवसाय करण्यासाठी पेढा प्रसाद ची दुकाने लावून बसलेल्या किरकोळ दुकानामुळे भाविकांना नुकसान होण्याचा दैवी साक्षात्कार झाल्याने की काय प्रशासनाने सहाव्या दिवशी अधीक्षक योगेश साबळे यांचेसह कर्मचारी पाठवून १३ दुकाने उठवून टाकली.याच दिवशी खासदार हेमंत पाटील दर्शनासाठी येथे आले असता अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.व निवेदन दिले असता मी प्रशांसनाशी चर्चा करून तुमची दुकाने पूर्ववत लावण्यासाठी सांगतो असे आश्वासन त्यांनी दिले. २० ते २५ वर्षांपासून सदरील दुकानदार त्या ठिकाणी पेढा फुल प्रसाद बोर विकून उदरनिर्वाह चालवितात. याच ठिकाणी अर्जंट फोटो काढणारे १४ फोटोग्राफर सुद्धा आहेत.परंतु पेढा कुंकू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना हाकलुन दिल्याने लघु व्यापारी हवालदिल झाले.
या व्यापाऱ्यांच्या साहित्याची झाली जप्ती
 अनुसया किशोर आमटे, (कुंकू प्रसाद),विक्रम शिवलिंग टाकळीकर,(लिंबू सरबत), माधव लक्षमण मुंडे ,(पेढा प्रसाद),रागिणी जीवन खडसे (पेढा प्रसाद),बालाजी मुंडे ,(पेढा),अंजनाबाई शेडमाके (लंगदु बोर),गजानन जोगदंड (कुंकू प्रसाद),अनिल जोगदंड (कुंकू प्रसाद), संजय जाधव (पानाचा विडा), परमेश्वर जनार्दन केंद्रे (पेढा प्रसाद),वेणूबाई भालेराव, (प्रसाद) ,कमलाबाई जाधव (लगदु बोर), आकाश अभिमान चव्हाण (पेढा प्रसाद) यांची दुकाने व जेवणाचे डब्बे तसेच गल्यातील रक्कम सुद्धा गुंडाळून नेल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे.
 या पूर्वी अनेक वेळा सूचना दिल्या:- साबळे
संस्थांचे पदसिद्ध सचिव साह्य्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या पूर्वी स्वतः सदर दुकानदारांना पायऱ्या भाविकांसाठी मोकळ्या सोडून इतरत्र दुकान लावण्या च्या सूचना केल्या होत्या.मात्र त्यांनी दुकाने हटविले नाही.वन विभागाच्या नोंदीत असलेल्या दुकानाच्या यादीत ह्या दुकानाचा समावेश नाही.
योगेश साबळे व्यवस्थापक मंदिर संस्थान
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!