घर Breaking news पाउले चालली रेणुका मंदिराची वाट; मंदिर उघडल्याने भविकात आनंद मात्र कोरोना नियमा...

पाउले चालली रेणुका मंदिराची वाट; मंदिर उघडल्याने भविकात आनंद मात्र कोरोना नियमा मूळे अनेक भाविक दर्शनाला मुकले!

माहूर:- अश्विन शुद्ध प्रतिपदेला काल नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी गुरुवारी दिनांक ७ सकाळपासूनच दर्शनासाठी हजेरी लावली होती. मंदिर प्रशासनाने शासनाने केलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला मात्र, व्ही.वी आय पी व काही स्वयं घोषित नेत्यांकडून नियमांचा भंग होत असल्याने सामान्य भाविकांकडून नियमा च्या पालनाची अपेक्षा करणे गैर ठरेल. सोशल डिस्टंसिंग मास्क या दोन महत्त्वाच्या नियमांना काही भाविकांकडून बगल देत नियम भंग केल्याचे प्रथम माळेला दिसून आले.
राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवार (दि. ७ ऑक्टोबर) पासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याने व प्रशासनाने सुद्धा आपली स्वतंत्र कठोर नियमावली जाहीर करत लसीकरण आवश्यक केले.सोबतच ऑनलाईन ऑफलाईन चा खेळ मध्यमवर्गीय सामान्य नागरिकांच्या डोक्यावर गेल्याने भाविकांची संख्या रोडावली.
देवीचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध
गर्दी टाळण्यासाठी भाविकांना देवीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थानतर्फे अनेक वर्षांपासून बंद असलेली वेबसाईट सुरू केलेली आहे.त्या मुळे भाविकांना ऑनलाइन दर्शन घेता येईल.यूट्यूब चॅनेलवरही दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.
_______________________
भाविकांकडून नियमभंग…
मंदिर प्रशासनाने कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, काही भाविकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क व्यवस्थित न घालणे, एकत्रित गप्पा मारणे, एका ठिकाणीच गर्दी करणे, असे प्रकार होत असल्याचे काल प्रथम दिनी दिसून आले. मंदिरातील कर्मचारी, पोलीस वेळोवेळी सूचना करत असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही काही भाविकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नाही.आज शुक्रवार रोजी तर अत्यल्प भाविकांनी दर्शना साठी हजेरी लावली.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!