घर Breaking news परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारली माहूर तहसीलदार पदाची सूत्रे!

परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारली माहूर तहसीलदार पदाची सूत्रे!

माहूर:- माहूर येथील वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर  यांची संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे बदली झाल्याने माहूर तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.राकेश गिड्डे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माहूर शहरातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,व जागरूक नागरिकांच्या वतीने आज दिनांक 21 मंगळवार रोजी सत्कार करण्यात आला.
निजामशाही प्रशासन चालवण्याच्या प्रयत्नात नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या माहूर येथील वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांच्या बदली ने रिक्त झालेल्या पदावर परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.त्यांनी आज मंगळवारी रिक्त झालेल्या तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारल्या ने त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसानी,माजी सभापती तथा युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार, नगर सेवक रफिक सौदागर, इलियास बावानी,प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य प्रा.भगवान जोगदंड,सरपंच लक्ष्मण घुले, मनसे चे गाजानन कुलकर्णी, प्रमोद राठोड,राजू चव्हाण,नगर सेवक प्रतिनिधी इरफान शेख,जयकुमार अडकिने,राज ठाकुर,सरफराज दोसानी,स्वप्नील आडे,शेख मुस्ताक बाबनजी,इरफान टेलर,शेख शफीक हसन,शोयेब मलिक,अब्दुल रहमान शेख आली,दाऊद दुंगे,समीर शेख मजीद,शेख नजीर,दाऊद खान,उमर फारुक,दानिश शेख,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

सत्काराचा वेग आणि तहसीलदारांच्या  कार्याचा आलेख वाढत राहिला….

आज मंगळवारी विविध संघटना राजकीय पक्ष लोकांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांचा सत्कार केला. यात काँग्रेस चे प्रा.राजेंद्र केशवे, भाग्यवान भवरे, शिवसेनेचे निरधारी जाधव, दीपक कांबळे, विकास कपाटे,रुपेश कोवे, भाजपचे नाना लाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!