घर Exclusive दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व कर्मचारी संगनमतांनी तहसील कार्यालयाचे कर्मचारी करीत असल्याच्या पुराव्यानिशी तक्रार झाल्या आहेत.मात्र,कार्यवाही तर सोडाच तक्रारी च्या अनुषंगाने साधी चौकशी होत नसल्याने अंधेर नागरी चौपट राज चा अनुभव माहूर वाशियाना येत आहे.
परस्पर दांडी मारणारे,आदल्या दिवशीच मस्टवर सही करणारे आणि सकाळी कार्यालयीन वेळेवर न येता निवांत कामावर येणारे लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहूर तालुक्यातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,जागरूक नागरिक म्हणून मिरवणाऱ्याना सवय झाली असल्यानेच कर्मचाऱ्यांना फावले आहे. सामान्य नागरिक कार्यालयात कामासाठी हेलपाटे खात फिरत असला तरी याची कुठे हि ना हाक ना बोंब अशी परिस्थिती माहूर शहरातील प्रत्येक विभागाची झाली आहे.परंतु या ही पेक्षा भयंकर म्हणजे चक्क तहसीलच्या शासकीय चालकाने अनेक वर्ष आपल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने खाजगी चालक नेमून लाखोंचा पगार फस्त केला,ही घटना दोन  महिन्या पूर्वी उघडकीस येऊन त्याचा अनेक तक्रारी झाल्या, मात्र तहसीलदाराला वाचविण्यासाठी साधी चौकशी करण्याचे सोपस्कार ही जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पार पडले नाही.त्या पाठोपाठ च नुकतेच तहसील मधील अव्वल कारकून हा विना रजा गैरहजर असल्याचे प्रकरण पुढे आले,ह्या पठ्ठ्याने तर चक्क गैरहजर असताना हजेरी पटावर सह्या मारल्या आहेत.जे की,शिस्तभंग तर आहेच शासनाची फसवणूक असून त्याच्यावर चौकशी अंती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा इतका गंभीर प्रकार आहे.मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्याला वाचविण्याची जणू प्रथाच महसूल विभागात सुरू झाली आहे असे अनुभव माहुरकराना येत आहे.नियम ४८ प्रमाणे विना परवाना रजेवर जाणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल तसेच रजा संपल्‍यानंतर स्‍वेच्‍छेने गैरहजर राहणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल.असा शासन निर्णय आहे.एवढेच नव्हे तर, कर्मचारी गैरहजर असल्याचा कालावधी ‘रजेविना गैरहजर’ असे ग्राह्य धरून तो सेवेत न मोजण्याचा निर्णय सुद्धा आहे.मग दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यां बाबतीत तहसीलदारांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून सुद्धा कार्यवाही ला विलंब का होतो हे न उलगडणारे कोडे आहे.
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी अर्थात 11 महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून शासकीय, नागरिकांची कामे पार पाडावीत, असे स्पष्ट करुन गैरहजर अथवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देय असलेला घरभाडे भत्ता कपात करण्याची कार्यवाही करुन, संबंधीत विभाग प्रमुख यांनी त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी, असे परिपत्रक निर्गमीत केले होते, याची अंबलबजावणी होत नसल्याने दुर्दैवाने नागरिकांना या परिपत्रकाची आठवण करून देण्याची पाळी आली आहे.माहूर च्या चालक जिंदंम संदर्भात पुराव्यानिशी गल्ली ते दिल्ली पर्यंत तक्रारी झाल्या तरी चौकशी ही झाली नसल्याने व कुठल्याच शाशन निर्णयाची अंमलबजावणी वरिष्ठ अधिकारी करीत नसल्याने तक्रारदार अमित येवतीकर यांनी प्रधान सचिवांकडेच लेखी तक्रार नोंदविली असून वरील सर्व प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष घालुन,नागरिकांच्या सेवेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्त व नियमांचे पालन करण्याबाबत सुचना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तर अव्वल कारकून संतोष पवार बाबतीत हाताच्या काखण्याला आरसा कश्याला असे पुरावे दस्तुर खुद तहसीलदार राजेश गेिड्डे यांच्या कडे उपलब्ध असताना त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी भा.प्र से कीर्ती किरण पुजार यांच्या कडे कार्यवाही चा चेंडे फेकून काखा वर केल्या आहेत.त्या मुळे जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो असे म्हणण्याची वेळ आली आहे.
##  तहसील कर्यालयच नाही इतर ही कार्यालयात हीच परिस्थिती ##
दांडीबहाद्दर कर्मचारी बाबतीत केवळ तहसील कर्यालयच पुढे आहे असे नाही,सर्वच विभागात हीच परिस्थती आहे.तहसील विभागाचे उघडे झाले,इतर विभागाचे झाकून आहे. मुख्यालयाची अलर्जी असलेल्या माहूर तालुक्यातील सर्व विभागाला शिस्त लागावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सरप्राईज भेट देऊन एकाच वेळी किमान पाच सहा कार्यालय तपासल्यास किती 
कर्मचारी हजर आहेत, किती अधिकाऱ्यांचे रजेचा अर्ज आहेत, रजेचा अर्ज कुठल्या अधिकार्‍याचे आहेत, खरा की खोटा, त्यावर तारीख की विना तारखेचा आहे, याची पडताळणी केल्यास धक्कादायक परिस्थिती बाहेर येईल पण जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळेल तेव्हाच…तूर्तास एवढेच पुरे!
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!