घर Breaking news दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातातील सात भाविकांना यवतमाळ ला हलवले! ऑटो पलटल्याने 13...

दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातातील सात भाविकांना यवतमाळ ला हलवले! ऑटो पलटल्याने 13 भाविक जखमी!

माहूर :- माहुर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्ग्यावर जात असलेल्या भाविकाच्या ऑटो ला दत्तशिखर – दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातात 13 भाविक जखमी झाले असून सात भाविकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी यवतमाळ ला हलविण्यात आले आहे.
माहूर तालुक्यातील शे.फ.वझरा येथे नवस फेडण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भाविक जात होते,दत्त शिखर – दत्त मांजरी घाटात कठीण वळणावर ऑटो क्रमांक एम.एच.04 एफ जे 0551 च्या चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुजिद खान (45) शेख मुजरेद्दिन (70) राहील शेख रज्याक (20) सय्यद फसिक (26), फयाद शेख (12) सय्यद इफाक ( 28) सादिक शब्बीर शेख (28) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचारा साठी हलविण्यात आले. तर सय्यद फारुख शेख (26),शेख साबीर शेख मस्तान (45),रूखसूना बेगम सुभेदार खान (40) शेख अहेमद शेख हनीफ (52),शेख खाजा शेख अजीज (35), साजीद मलनस हरून (39),अयान पठाण अमन (11) हे किरकोळ जखमी झाले आहे.सर्वच जखमी वर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ.उदय काण्णव,व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले.दत्तशिखर दत्तमांजरी घाटात यापूर्वी अनेक वेळा अपघात झाले असून कठीण वळणावर सूचना फलक लावणे व अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!