घर Breaking news तालुका तापाने फणफणत असताना माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा वाऱ्यावर!

तालुका तापाने फणफणत असताना माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा वाऱ्यावर!

माहूर:- रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारे ठिकाण. सुसज्ज, स्वच्छ आणि उपचार देण्यासाठी सक्षम असे रुग्णालय तालुक्यात, शहरात असले तर अनेक रुग्णांचे जीव वाचतात. मात्र याच रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या, कुठल्याही तपासण्या न होणे, औषधी चा अपुरा साठा, नियोजनचा अभाव असला तर रुग्णांनी जायचे तर कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो.तालुक्यातील 90 च्या वर गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकमेव असलेल्या माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात असाच प्रकार सुरू असल्यामुळे ‘आम्हाला कोणी वाली आहे का नाही’, असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असताना  अचानक डेंगीच्या व इतर तापांच्या आजाराने तालुक्यात थैमान घातले आहे.खाजगी व शासकीय दवाखाने रुग्णाने फुल्ल झाली आहे.अशा बिकट परिस्थती मध्ये माहूर ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू, टायफड, निदानासाठी आवश्यक असलेल्या किटस् दवाखान्यात उपलब्ध नाही.साधे रक्त तपासल्यावर त्याचे रिपोर्ट दोन दिवसांनी रुग्णांना मिळतात.एकूण ३२ तपासण्या मोफत व्हाव्या म्हणून शासनाने एच.एल. एल कंपनीला ठेका दिला आहे.मात्र या कंपनी कडून रुंगाना वेळेवर सेवा मिळत नाही.दिवसभरातील रक्ताचे घेतलेले नमुने सायंकाळी कंपनीचा व्यक्ती जमा करून किनवट ला घेऊन जातो व दुसऱ्या किवा तिसऱ्या दिवशी ते रिपोर्ट रुग्णांना देण्यात येते इतकी विदारक स्थिती असताना सर्व काही आलबेल असल्याचा देखावा रुग्णालय प्रशासान करीत असून रुग्ण कल्याण समिती चे या कडे स्पेशल दुर्लक्ष होत असल्याने रुग्ण सेवेची परिस्थती बद्द चे बद्दत्तर होत चालली आहे.
या ही पेक्षा भयानक म्हणजे माहूर येथील नियुक्त असलेले एम.बी.बी.एस तिन्ही डॉक्टर हे आडी पाडी ने प्रत्येकी दोन दोन दिवस रुग्ण सेवा देत असून एकाने मुखेड येथे तर एकाने किनवट येथे आपली खाजगी रुग्णालय थाटली आहेत.हे विदारक सत्य रुग्णालयात असलेल्या बायोमेट्रिक ची तपासणी झाल्यास पुढे येईल.या शिवाय वैद्यकीय अधीक्षक, कार्यालयीन अधिक्षक, नेत्र रोग तज्ञ ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत.आमच्या प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारला असता मागील एक वर्षा पासून खोकल्याचे औषध व जखमेवर लावण्याचे मलम रुग्णालय पुरवठा च झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.साथ आजारावरील नियंत्रणाची नाहीतर उपचाराची देखील जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शहरात व तालुक्यात साथ आजाराचा भडका उडाला आहे. खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्यात नसल्यामुळे गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही.दर दिवसाला ग्रामीण रुग्णालयात दिड शे ते दोन शे रुग्णाच्या तपासणीची नोंद होत असल्याने व त्यातील अधिकाधिक रुग्ण तपाचे असल्याने रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.मात्र रुग्णालय तपासण्या होत नसल्याने तपासणीसाठी जावे तरी कुठे असा प्रश्न गरिबांसमोर उभा ठाकला आहे.येथील रुग्णांना खासगी ‘पॅथालॉजी’कडे पाठविले जात असल्याचे प्रकरण उजेडात आले होते. यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,संपर्क होऊ शकला नाही.
हाताच्या काखण्याला आरसा कशाला या उक्ती प्रमाणे दवाखान्यात लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक ची तपासणी करून आयुष,व इतर कंत्राटी डॉक्टरांच्या भारोष्यवर दवाखाना सोडून केवळ दोन दिवस ड्युटी करणाऱ्या डॉक्टरांवर कार्यवाही करावी….
 नंदू संतान 
रुग्ण कल्याण समिती सदस्य माहूर
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!