घर Breaking news जिल्हा आरोग्य अधिकारीची मालवाडा गावाला भेट

जिल्हा आरोग्य अधिकारीची मालवाडा गावाला भेट

आरोग्य पथका सह गावात केली पाहणी 

माहूर:- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे यांनी आज दिनांक १८ रोजी मालवाडा येथे भेट देऊन आरोग्य विभागाने केलेल्या कामकाजा विषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.या वेळी त्यांच्या समवेत माहूर चे गट विकास अधिकारी विशाल सिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे,आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.जी.बी.जाधव, यांची उपस्थिती होती.

माहूर तालुक्यातील मालवाडा गावात मुलगी व जावयाला भेटायला आलेल्या उमरखेड तालुक्यातील धानोरा येथील ६४ वर्षीय पुरुष गेल्या आठवड्यात कोरोना बाधित आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.या पूर्वी ही मालावाड्याला सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल,व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी ही भेट दिली होती.सोमवारी दुपारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे यांनी ही मलावाडा गावाला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा येथील पथकाकडून करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त करत आवश्यक सूचना केल्या.या वेळी आरोग्य कर्मचारी रमेश गावंडे,माजी सरपंच लक्ष्मण बेहरे गावातील कोरोना विरोधी पथकातील नागरिक उपस्थित होते.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!