घर Breaking news ग्रामीण भागातील नागरिकांची प्रकाशातून अंधारा कडे वाटचाल!

ग्रामीण भागातील नागरिकांची प्रकाशातून अंधारा कडे वाटचाल!

माहूर:-(सरफराज दोसानी) दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात येतो. मात्र, अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाल्याने घराघरांत जळणारा दिवा, कंदील केवळ शो पिस बनून राहिले आहे.त्यातच पावसाळ्यात विजेचा होणारा लपंडाव,ग्रामीण भागात तासनतास गायब असणारी वीज,सोबतच सक्तीच्या वीज वसुली मुळे कट झालेले विद्युत कनेक्शन या गर्तेत सापडले ग्रामीण भागातील नागरिक प्रकाशातून अंधारा कडे वाटचाल करीत असल्याचे चित्र माहूर तालुक्यात निर्माण झाले आहे.
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजार जळतात.त्या मुळे अनेक महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला.त्या योजनेचे लाभार्थी माहूर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक सुद्धा आहेत. पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली.आता मात्र गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने ग्रामीण भागातील हातावर पोट असणारी गरीब जनता शेवटी  सरपण गोळा करुन स्वयंपाक शिजिवत असल्याचे चित्र दिसत असल्याने सदर योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता असते,परंतु लिटर दोन लिटर तर सोडा केरोसीन चा थेंब ही मिळत नसल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वारा पाऊस सुरू झाला की  महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो.त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागतो. लकेरोसीन बंदीमुळे दिवा,कंदीलचा उपयोग होताना दिसत नाही.
इंधनाबरोबरच खाद्य तेलाच्या दरवाढीने सामान्यांचे हाल
गेल्या दीड वर्षां पासून सर्व सामान्य जनता कोरोना महामारीचा सामना करीत आहे.त्यातच होणाऱ्या सतत दर वाढी मुळे सर्व सामान्य माणसाला   जगणे कठीण झाले आहे.त्यातच इंधन दरवाढी बरोबर गॅस दर वाढीने,खाद्य तेलाच्या दर वाढीने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.घरगुती गॅसने तर हजाराकडे आगेचुक केली आहे.गत महिन्यात १९० रुपयांची दरवाढ झाली आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!