घर मंथन "गोष्ट तेव्हाची..आपण जेव्हा मूल होतो....!!"(काव्यसरीता)

“गोष्ट तेव्हाची..आपण जेव्हा मूल होतो….!!”(काव्यसरीता)

“गोष्ट तेव्हाची..आपण जेव्हा मूल होतो….!!”


बोलायचो लबाड.. तरी आपण खरे होतो
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो….!!

वाटतं परतावं बालपणातील त्या मखमली दुनियेत…
जिथं गरज नव्हती कुठली अन् नव्हतं काही गरजेचं..
जमा करून पाहीली माती..अन् खेळणेही घेऊन खेळले…
तसे हसणे परत कधीच मुखावर तेव्हासारखे ना खळखळले….
आज कुठं पावसाचा चिंब भिजरा खेळ होतो…?
बोलायचो लबाड..तरी आपण खरे होतो..
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो….!!

तेव्हाचे चिंचा-बोरं-आंबे चढून झाडांवर चाखलेले..
शेजारी रानातले काकडी-शेंगा-कणसं चोरलेले…
गुलेरीने मडके अपसूक कुणीसे फोडलेले…
आपण नसतानाही तिथे आपले नाव मात्र जोडलेले…
तेव्हाची चोरी,तोड फोडं..सार कसं वाटे गोड…
होतोच उनाड..तरी आम्ही मधाळ..रसाळ गरे होतो…
बोलायचो लबाड..तरी आपण खरे होतो..
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो…!!

नजर चुकवत घरच्यांची उन्हात भन्नाट खेळत गेलो..
अनेक डावं अंगलट आले तेव्हा.. घरातच लोळत गेलो…
चार चौघे जमलो तेव्हा आमची मोठी गम्मत येई..
प्रत्येकाची आगळी गोष्ट आळीपाळीने रंगत जाई…
आज बख्खळ गोष्टी.. ठाऊक..सांगण्या ऐकण्या फुरसत नाही..
खेळं विराली..उने पोळती..बघता स्वतःतच जो तो….
बोलायचो लबाड..तरी आपण खरे होतो…
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो….!!

तुटके-फुटके तुकडे…हेच आमचं धन होतं…
दोस्तासाठी तळमळणारं स्वच्छ..असं मन होतं…
नाती होती घट्ट अशी उष्टं बिष्टं चालून जाई…
प्रत्येकाला वाटे आपलीच…प्रत्येकाची प्रेमळ आई..
जाती नव्हत्या माहीत तरीही… आम्ही प्रत्येकाचे नातलग होतो…
बोलायचो लबाड…तरी आपण खरे होतो…
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो….!

आज मिळाली दौलत…समाधान हरवले..
आज भेटले पदवी…पद..आनंद गहिवरले…
आज मिळाले सहकारी मित्र..पण बालपणीची बात नाही..
दोस्ताच्या डब्यातल्या चटणी-भाकरीचा…
पिज्जा-बर्गर…कशातच.. स्वाद नाही…
हरवले औदार्य…हरवले आपलेपण…हरवले स्वच्छंदी मन…
हरवले ते बालपण…
आज परत त्या दिवसांचा ‘तो बहर’ सदा याद येतो…
बोलायचो लबाड..तरी आपण खरे होतो..
गोष्ट तेव्हाची आपण जेव्हा मुल होतो….!!

हृदयाक्षर….(मिलींद कंधारे)


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!