घर Breaking news गुटखा वाहतूक करणाऱ्या एक्स व्ही ५०० मध्ये सापडला चाकू - सुरा! ...

गुटखा वाहतूक करणाऱ्या एक्स व्ही ५०० मध्ये सापडला चाकू – सुरा! माहूर पोलिसांच्या कार्यवाहीत अवैध गुटख्या सह साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त!

माहूर:- गुटखा व सुगंधीत तंबाखुजन्य प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा साठा विनपरवाना बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना एक्स व्ही ५०० या आलिशान गाडी मध्ये चाकू – सुरा ताब्यात बाळगलेला मिळुन आल्याने आरोपी बाबर अहेमद फकीर महम्मद रा.माहूर यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा  तसेच शस्त्र अधीनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर शहरात मंगळवार रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास माहूर पोलिस निरीक्षक नामदेव रिठे, सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल आनंद राठोड, साहेबराव सगरोळीकर, चालक रामचंद्र दराडे व छगन जाधव पेट्रोलिंग करीत असतांना गोपणीय खबऱ्या कडून मिळालेल्या माहिती वरून बस स्थानका जवळील गौसिया फर्टीलायझर समोर पोलिसांना  संशयित वाहन आढळून आले.त्या वाहनाची झाडाझडती घेतली असता माहूर पोलीस ही थक्क झाले असून वाहनामध्ये घातक शस्त्र चाकू – सुरा सापडल्याने संपूर्ण वाहन तपासले असता माहूर शहरातील सोनापीर दर्गा परिसरात राहणाऱ्या बाबर अहमद शेख फकीर महंमद याचा आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसां च्या हाती लागले.नायलॉन पांढऱ्या रंगाच्या पोत्यात १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा पान मसाला,३१ हजार  २०० रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू,५७ हजार रुपये किमतीचे सुगंधी पानमसाला,१४ हजार रुपये किमतीचे सुगंधी तंबाखू,१५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची आलिशान चार चाकी एक्सयूव्ही ५०० वाहन असा एकूण १७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. सदर प्रकरणी माहूर पोलिसांनी आज दिनांक २२ बुधवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी बाबर अहेमद फकीर महम्मद रा.माहूर यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच शस्त्र अधीनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.या धक्कादायक घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार हे करीत आहे.
   आरोपी फरार होण्यात यशस्वी
माहूर पोलिसांनी आज धाडसी कार्यवाही करत साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला असला तरी पोलीस समोर दिसल्याने गाडी ला चावी तशीच ठेऊन गाडीतून आरोपी पोलिसा समोर फरार झाला.माहूर शहरात मागील काही दिवसा पासून गुटखा,आमली पदार्थ तस्करीत व जुगार व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे.या बाबत अनेक तक्रारी सुद्धा झाल्या आहेत.मात्र अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.त्या मुळेच गुन्हेगार प्रवृत्ती वाढून अवैद्य धंद्याला चालना मिळत आहे. आता हे गुटका व जुवा चालवणारे तस्कर थेट शस्त्र बाळगायला लागल्याने यांच्याकडे आजवर केलेल्या अर्थपूर्ण दुर्लक्ष पणा  कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तीर्थक्षेत्र माहूरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे काळाची गरज असल्याचे शांतता प्रेमी अनेक नागरिकांचे मत आहे.
आरोपी विरूद्ध पोलिसांनी दाखल केले गंभीर गुन्हे
बंदी असलेला अवैध गुटखा व शस्त्र बाळगल्या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्याचे जमादार आनंद कनिराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुरन ११८/२०२१ कलम ३२८, २७२,२७३ भादवि सहकलम अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम २६, २६ (२)(i). २६(२) (iv), ३०(२)(a).५९ तसेच शस्त्र अधीनियम
१९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!