घर Exclusive गांधी जयंती दिनी रोजगार सेवकांचे एक दिवसीय सत्याग्रह! ...

गांधी जयंती दिनी रोजगार सेवकांचे एक दिवसीय सत्याग्रह! गटविकास अधिकारीना दिले निवेदन!

माहूर:- महात्मा गांधी जयंती दिनी रोजगार सेवकांचे विविध मागण्या संदर्भात पंचायत समिती माहुर समोर एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन गट विकास अधिकारी यांना महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका माहूर च्या वतीने देण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा २००५ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोहयो चे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात येवून नियुक्ती करण्यात आलेली आहे.मनरेगा कायद्यानुसार ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती.परंतु महाराष्ट्र सरकारने २मे २०११ रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ बाह्यस्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर २.२५% ते ४.५०% ,६% पर्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.महाराष्ट्रातील रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए, डिए, देण्यात येत नाहीत.मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ पण त्या मजुरांवर दिवसभर लक्ष देवून काम करून घेणारे ग्रामरोजगार सेवक मात्र अर्धवेळ बाह्यस्त कर्मचारी, रोजगार हमी योजनेच्या जनक असलेल्या राज्यात रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक यांच्यावर अन्याय सुरू आहे. सहा सहा महीने तुटपुंजा असलेला मानधनही पदरी पडत नाही. प्रवास भत्या चा पता नाही. लागणारी सामग्री कुठे अडकली याचा बेत नाही. स्वतंत्र कक्ष उभे करण्याचे नियोजन हवेतच उडाले. अशा एक ना अनेक अडचणी असुन त्यास भरीस भर म्हणून स्थानीक राजकारण मग काम करावे तरी कसे या व इतर मागण्या संदर्भात महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्र भर आंदोलने होत असुन त्या प्रमाणे माहुर येथे ही आंदोलन होणार असल्याचे निवेदन आज बुधवार रोजी देण्यात आले. यावेळी प्रल्हाद चव्हाण,बंडु पाटील ,दत्ता राठोड, गणेश पवार ,मुस्तफा खिलची ,अवधुत पाटील, संजय मानकर, वसंत राठोड ,युवराज राठोड ,नारायण दिसेवार ,रतिष गेडाम ,प्रकाश कुडमेथे,गणेश राठोड,लखन शेंडे सह उपस्थित होते.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!