घर Exclusive गटातटात विभागलेल्या माहूर भाजपला संघटनात्मक बांधणीची गरज !

गटातटात विभागलेल्या माहूर भाजपला संघटनात्मक बांधणीची गरज !

शिवसंग्रामच्या रूपाने आमदार मिळूनही भाजपाला संघटनात्मक लाभ नाहीच ! 

माहूर(विशेष प्रतिनिधी):-  तत्कालीन आमदार माजी राज्यमंत्री माजी खासदार डी.बी. पाटील यांच्या १० वर्षाच्या आमदारकीनंतर माहूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात सुरु असलेली गटबाजी थांबता थांबेना झाल्याने राष्ट्रवादीचे माजी आ.प्रदीप नाईक यांनी किनवट विधानसभा मतदारसंघावर तब्बल १५ वर्ष अधिराज्य गाजविले, मात्र २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडनुकीत काही स्वकीयांनीच त्यांना दगा दिल्याने शिवसंग्रामच्या रूपाने व गत पाच वर्षात किनवट विधानसभा मतदारसंघात भाजप जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचे करोडो रुपये खर्च केलेले भाजपाचे दिलदार मात्तबर नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने किनवट विधानसभा मतदारसंघात आमदार भीमराव केराम यांचा २२ वर्षाचा राजकीय वनवास संपला त्यामुळे या मतदारसंघात भाजपाला आता अच्छे दीन येतील अशी अशा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना होती मात्र या बाबीचा माहूर तालुक्यात भाजपाला संघटनात्मक बांधणीत यश आल्याचे दिसत नाही.

डीबी मामाच्या कारकीर्दनंतर या तालुक्यात भाजपाला लागलेले गटबाजीचे ग्रहण अधिकच वाढले असून नंतर मोदी लाटेवर स्वार होऊन सत्तेचा मलिदा चाखण्याचा हेतू ठेऊन इतर पक्षातील अनेक जण या पक्षात आले व आपापले वेगवेगळे गट निर्माण करून राहू लागले. त्यामुळे गत पाच वर्षात राज्यात सत्ता असतांनाही माहूर तालुक्यात भाजपाला संघटनात्मक बांधणीत यश येऊ शकले नाही असे असले तरी माजी तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील यांना आहे ते टिकवण्यात मात्र नकीच यश आल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. नंतरच्या काळात मात्र विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या इच्छुक नेत्यांचे अनेक गट तालुक्यात निर्माण झाले. त्यामुळे एकमतच होत नसल्याने संघटनात्मक बांधणीत माहूर भाजपा बऱ्याच प्रमाणात मागे पडली आहे. नव्या तालुकाध्यक्ष निवडीत अनेक गटांना ओव्हरटेक करत अॅड. रमण जायभाये गटाचे समव्यवसायी सामान्य कार्यकर्ते अॅड.दिनेश येउतकर यांच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडल्याने इतर गटातील अनेक कार्यकर्ते दुरावले असून तेव्हापासून किनवट मतदार संघात शिवसंग्रामच्या रूपाने भाजपचे आमदार जरी निवडून आले असले तरी भरीव सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या नजरेत भरण्यासारखे कार्य करता आले नसल्याने भाजपाला माहूर तालुक्यात संघटनात्म्क बांधणीची आवश्यकता असल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दबक्या आवाजातील प्रतिक्रिया चमडी बचाव धोरण ठेऊन येत आहेत. विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेऊन असलेले उमेदवारी न मिळल्याने गप्प बसलेले दिसत असून त्यांचा पक्षाबद्दलचा जिव्हाळा उमेदवारी मिळविण्यासाठीच होता हे स्पष्ट होत आहे.

मतदारसंघात भाजपाला पक्षाचा आमदार असला तर तालुका नेतृत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारच कुणीतरी रिमोटवरून चालवत असल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काहीही उपयोग होत नसल्याचे राजीकीय धुरिणात बोलल्या जात आहे. याकडे भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने लक्ष देणे अवश्यक असल्याचे मत अनेक जनसंघाच्या दिव्यापासून भाजपासोबत असलेले वयोवृद्ध कार्यकर्ते व त्यांच्या पावलावर पाउल ठेवत भाजपाचे कमळ हाती घेतलेले एकनिष्ठ कार्यकर्ते नावाच्या प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणे पसंद करीत व्यक्त करीत आहेत.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!