घर Breaking news केंद्रातील भाजपाचे सरकार ब्लॅकमेलर :- आ. नाना पटोले सीबीआय व ईडी...

केंद्रातील भाजपाचे सरकार ब्लॅकमेलर :- आ. नाना पटोले सीबीआय व ईडी चा दबाव तंत्रासाठी गैरवापर होत असल्याची केली टीका!

माहूर(सरफराज दोसानी) देश बरबाद करण्याचे केंद्रातील भाजपा सरकारने ठरविले आहे,  देश विरोधी जी कामे भाजपाची केंद्र सरकार करीत आहे, त्या सगळ्या विषया वरून जनतेचे लक्ष विचलीत कसे करायचे तर सीबीआय व ईडी लावा आणि सातत्याने माध्यमामध्ये हा विषय दाखवत ठेवा.कायद्याचा गैरवापर करून सगळ्याना त्रास देऊन ब्लॅकमेल करण्याचा काम केंद्र सरकार करीत आहे.असा आरोप काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी केला.
माहूर गडावर दर्शनासाठी आज दिनांक १२ मंगळवार रोजी आलेले प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मारोती रेकुलवार यांच्या कार्यालयात भेट दिली असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ना ला उत्तर देताना ते म्हणाले की, आज महागाईचा उच्चांक कधी नव्हे तेवढा वाढला आहे. गॅस पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून सामान्य नागरिकांची जगणे केंद्र सरकारने मुश्कील केले आहे. देश विकण्याची परंपरा भाजपाने पहिल्यापासूनच मनुवाद्यांच्या माध्यमातुन ठरविली होती. याला लपविण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर होत आहे. हे देशातील जनतेला कळले सुद्धा आहे. पुढील काळात भाजप देशातून जमीनदोस्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की स्वबळावर निवडणुका लढणार या विषयावर बोलताना त्यांनी मतविभाजन हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे सांगत अस्तित्वाची लढाई लढताना सर्वांनीच काँग्रेसच्या मतांचे विभाजन केले आहे, काँग्रेसच्या सेक्युलर मतांचा विभाजन हे जाणीवपूर्वक करण्यात आले. जी जातीवादी व्यवस्था आहे या व्यवस्थेला त्यामुळे ताकद मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकासआघाडी तीन ही घटक पक्षांच्या मतांचा टक्का वाढला असून भाजप यामध्ये मागे पडली आहे. एकत्रित निवडणूक लढविण्यास किती नुकसान होतो हे पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे.त्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय असून देश काँग्रेसच वाचूवू शकते असे ही नाना पटोले शेवटी म्हणाले.या वेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसानी,माजी सभापती मारोती रेकुलवार, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड,नगराध्यक्ष शीतल ताई जाधव,प्रा. भगवान राव जोगदंड, शहराध्यक्ष अमित येवतीकर,अनिल पाटील हडसनीकर,राजू चव्हाण,गोविंद मगरे पाटील,यांच्या सह अनेकांची उपस्थित होती.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!