घर Breaking news कार्यालयात गैरहजर राहून उपस्थित पाटावर स्वाक्षऱ्या; तहसील च्या कर्मचाऱ्यांच्या प्रताप! ...

कार्यालयात गैरहजर राहून उपस्थित पाटावर स्वाक्षऱ्या; तहसील च्या कर्मचाऱ्यांच्या प्रताप! तहसीलदारांनी पाठविला अहवाल!

माहूर:-शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून नेमून दिलेले कामकाज वेळेत पूर्ण करणे, हे त्यांची जिम्मेदारी असते, परंतु,माहूर तहसील विभागातील कर्मचारी विनापरवाना दिर्घकाळ गैरहजर तर असतात मात्र हजेरी पाठावर एकाच वेळी स्वाक्षऱ्या करीत असल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस आला आहे.याचे पुरावे ही पुण्यनगरी च्या हाती लागले असून या प्रकरणी आता दोषी कर्मचाऱ्यावर कोणती कार्यवाही होते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
माहूर तहसील कार्यालयातील कर्मचारी कामावर न येण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विविध कामासाठी तहसील कार्यालयात तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना निवासी कर्तव्यावर राहणारे कर्मचारी वेळेवर भेटतच नाहीत. त्यामुळे संबंधीत लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी एक दिवस अनाधिकृत गैरहजर राहिल्यास त्याला नोटीस करून खुलासा मागविला जातो. उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या कार्यालयातून रुजू आदेश घेऊन यावे लागते असा या कार्यालयाचा पायंडा आहे. मात्र तत्कालीन तहसीलदारांच्या गळ्यातील ताईत असलेले महसूल शाखेचे कारकून संतोष पवार हे वेळोवेळी अनधिकृत गैरहजर राहून एकाच वेळी हजेरी पाठावर स्वाक्षऱ्या करतात.याचे वास्तव दर्शविणारे गैरहजर असतानाचा हजेरीपट व नंतर केलेल्या स्वाक्षरीचा हजेरीपट पुण्य नगरीच्या हाती लागला असून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्या नंतर तहसीलदार राकेश गिड्डे यांना विचारणा केली असता त्यांनी तहसील कार्यालयातील महसूल शाखेचे कारकून संतोष पवार मागील महिन्याच्या शेवट पासून अनधिकृत रजेवर होते. दरम्यान त्यांनी त्यांचा सुट्टीचा अर्ज ई-मेल द्वारे पाठवला होता. परंतु निकडीच्या कारणाशिवाय अशा रजा मंजूर करता येत नसल्या कारणाने पवार यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सविस्तर अहवाल सहायक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले असले तरी हजेरी पटावरील स्वाक्षरीचा मुद्दा अतिशय गंभीर असून भाप्रसे असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर या प्रकरणी काय कार्यवाही करतात या कडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.
——— असा आहे अनुपस्थितीचा आलेख ——
सप्टेंबर मध्ये 06 ते 09 अनधिकृत गैरहजर 10 ते 13 सुट्ट्या (म्हणजे 06 ते 13 गैरहजर) 23 ते 30 गैरहजर,ऑक्टोबर मध्ये 01 ते 04 गैरहजर म्हणजे 23 सप्टेंबर पासून ते 04 ऑक्टोबर गैरहजर या शिवाय महत्वाचे म्हणजे गैरहजर असताना काही दिवसांनी हजार होऊन केलेल्या स्वाक्षऱ्या ह्या शासनाची फसवणूक करण्याच्या सदरात असून आस्थापना विभाग व कार्यालय प्रमुख ही याला तेवढेच जवाबदार आहे,याला दुमत नाही.
______ जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या निर्णयाने कारवाई होईल काय..? _____
शासनाच्या या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून शासकीय, नागरिकांची कामे पार पाडावीत, असे स्पष्ट करुन गैरहजर अथवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देय असलेला घरभाडे भत्ता कपात करण्याची कार्यवाही करुन, संबंधीत विभाग प्रमुख यांनी त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी, असे निर्देशीत केले आहे. याचबरोबर सर्व संबंधीत विभाग प्रमुखांनी शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांचे व शासनाचे कामे वेळेत होण्यासाठी कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या व मुख्यालयी न थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक क्रमांक सिडीआर-1300/प्र.क्र.9/00/11 दिनांक 17 ऑगस्ट 2000 अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले या पूर्वी दिले आहे.याच निर्णयाची अंबलबजावणी व्हावी अशी रास्त अपेक्षा सुभाष दवणे यांनी व्यक्त केली आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!