घर Breaking news एकाच दिवशी तिघा युवकांचा मृत्यू झाल्याने माहूर शहरात हळहळ; दोघांचा अपघातात तर...

एकाच दिवशी तिघा युवकांचा मृत्यू झाल्याने माहूर शहरात हळहळ; दोघांचा अपघातात तर एकाचा इमारतीवरून पडून मृत्यू!

माहूर:- नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरून  मोटरसायकल वरून माहूर कडे येत असताना आर्णी शहरातील स्वस्तिक जिनिंग जवळ 14 चाकी ट्रक ने विरुद्ध दिशेने येउन दुचाकी ला सामोरा समोर धडक दिल्याने दोघां तरुणांना मृत्यू झाला तर पुणे येथे निर्माणाधिन इमारतीवर काम करत असताना पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.एकाच दिवशी तिघा युवकांचा मृत्यू झाल्याने माहूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.महेश सटवाजी सोनेवार (17) शुभम दिलीप ढोबले (25) दोघेही रा.आंबेडकर नगर आणि दया ज्ञानेश्वर कालरवार वय (22) रा वडरपुरा माहूर अशी मृतकाची नावे आहे.
दया ज्ञानेश्वर कालरवा हा पुणे येथे निर्माणाधिन इमारतीवर काम करत असताना पडल्याने त्याचा वर मुंबई येथील ससून हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.तर महेश सोनेवार,शुभम ढोबले दोन्ही मृतक युवक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य आपल्या दुचाकी क्र  एम एच 26 ए पी. 8051 ने जेतवन येथे गेले होते,जेतवन येथुन आर्णी मार्गे माहूर ला येत असतांना  यवतमाळ रोड वरील स्वस्तिक जिनिंग जवळ 14 चाकी ट्रक क्र एम. एच. 37 टी 0818 हा आर्णी वरुन यवतमाळ च्या दिशेने रॉन्ग साईड ने जात असताना समोरुन येणा-या दुचाकीला सामोरा समोर धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन्ही युवक जागीच ठार झाले आहे.सदर अपघाताची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच आर्णी पोलिसांनी घटना स्थळ गाठुन पंचनामा केला व शव विच्छेदना साठी पाठविले.तिघे युवक मनमिळाऊ असल्याने त्यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!