घर Exclusive आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां कडून सुरू आहे. 
मागील काही दिवसा पूर्वी माहूर गडावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज पूजनाच्या निमित्ताने  स्वराज्य ध्वज यात्रेचे आगमन माहूर गडावर झाले होते,काही कारणास्तव आ.रोहित पवार त्या वेळी येऊ शकले नव्हते.त्या मुळे आमदार रोहित पवार कार्यकर्ता संवाद भेटीच्या निमित्ताने परभणी, हिंगोली, नांदेड दौऱ्यावर येत आहे. आमदार रोहित पवार यांचा दौरा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून दिनांक १६ ते १८  पर्यंत रोहित पवार मराठवाडा विभागाच्या नियोजित दौऱ्यावर आहेत. दरम्यान श्रद्धा स्थानांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. माहूर तालुका दौऱ्यात प्रारंभी श्री रेणुका देवीचे दर्शन व त्यानंतर राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे.त्यांच्या दोऱ्या मुळे युवकात उत्साह संचार ला असून ज्येष्ठ कार्यकर्ते ही स्वागतासाठी नियोजनात व्यस्त झाले आहे.आ. रोहित पवार यांच्या स्वागतासाठी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे अहवान जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,जिल्हा सरचिटणीस सभापती दत्तराव मोहिते,जिल्हा संघटक नगरसेवक फिरोज दोसानी,तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,युवक तालुकाध्यक्ष मा.सभापती मारोती रेकुलवार,कुंदन प्रकाश पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य भगवानराव जोगदंड पाटील यांनी केले आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!