घर Exclusive आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासी च्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कार्यवाही गरज...

आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासी च्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कार्यवाही गरज :- माजी मंत्री वसंत पुरके

माहूर:- आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्याय प्रविष्ट आहे.दोन प्रकरणात मी स्वतः न्यायालयात गेलो असून आदिवासींच्या जमिनीची झालेली लूट ही त्या त्या भागातील अधिकाऱ्यांच्या सहमती ने झाल्याने शासकीय अधिकारी यात सर्वाधिक दोषी आहेत.त्या मुळे आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासी च्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री वसंत पुरके यांनी व्यक्त केले.
आज दिनांक २३ गुरुवार रोजी माजी नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी यांच्या कार्यालयात वसंत पूरके यांनी भेट दिली असता त्यांचा दोसानी परिवाराच्या वतीने व पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस.एस.पाटील यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पत्रकरांशी केलेल्या दिलखुलस पणे बातचीत मध्ये माजी मंत्री पुरके यांनी बोगस आदिवासींच्या प्रकरणा वर प्रकाश टाकत राज्यातील इतर भागासह माहूर – किनवट तालुक्यात सुध्दा मोठ्या प्रमाणत आदिवासी समाजाच्या हक्का च्या नौकऱ्या,शैक्षणिक व इतर सवलती बोगस आदिवासीं नी बळकावल्या आहेत,तर हजारो कोटींच्या आदिवासी जमिनीवर गैर आदिवासीचा ताबा आहे. तालुक्यातील सारखणी येथील सिताराम रामजी डोनीकर यांच्या ३२ एकर भूखंड प्रमाणे राज्यात हजारो प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.माझ्या मतदार संघात सुद्धा एका आदिवासी कोलम समाजातील शेतकऱ्याची जमीन रेल्वे मध्ये गेली आहे.ही जमीन गैर आदिवासी लोकांनी शासना कडून जमिनीचा मिळणारा मोबदला लुटण्या साठी आपल्या नावावर करून घेतली होती.६ कोटी १९ लक्ष रुपयांच्या मोबदल्याचे हे प्रकरण व देवधरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील कोवे नामक शेतकऱ्याची २५ एकर जमीन एका माजी आदिवासी मंत्र्या ने शेतकऱ्यांचा मानसिक दुर्बलतेचा फायदा उचलून घेतली होती.ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात असून एका प्रकारात मी स्वतः याचिका दाखल केल्याचे माजी मंत्री पूरके यांनी सांगितले.आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी शेवटच्या श्र्वसा पर्यंत लढा देणार असून ज्या अधिकाऱ्याने आदिवासी जमिनीचे वाटोळे केले आहे त्यांना प्रथम चौकशीत दोषी म्हणून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शिक्षा व्हावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे आपण करणार  असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी प्रसिद्ध उद्योजक  रघुनाथ कापर्तीवार,संतोष अग्रवाल,नंदू संतान, हाजी कादर दोसानी, गजानन कुलकर्णी,सरफराज दोसानी यांची उपस्थिती होती.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!