घर Breaking news आखेर.... माहूरचे वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे बदली!

आखेर…. माहूरचे वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे बदली!

माहूर(सरफराज दोसानी):- पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे ‘संजय गांधी निराधार योजने’च्या तहसीलदारपदी तीन दिवसा पूर्वी बदली करण्यात आली होती,मात्र तक्रारीचा खच मंत्रालयापासून ते औरंगाबाद विभागीय आयुक्त, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पडून सुद्धा माहूर येथील वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची बदली झाली नसल्याने बुधवार दिनांक १५ रोजी महा विकास आघाडीचे काही कार्यकर्ते अनेक तक्रारीचा संच घेऊन मंत्रालयात पोहचले होते.त्या ठिकाणी संबंधितांना भेट घेऊन त्यांनी त्यांच्या बदलीची पुनश्च विनंती केली होती.तेव्हा आज – उद्यात ऑर्डर निघेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.आखेर आज दिनांक १७ शुक्रवार रात्री उशिरा विविध तहसिलदारांच्या झालेल्या बदल्यासोबतच माहूर येथील तहसीलदारांची सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे बदली करण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले.ते आदेश समाज माध्यमावर वायरल झाल्याने विविध पक्षातील तक्रारदार नेते,कार्यकर्ते नागरिकांसह तलाठी संघटनेला सुद्धा बदली ऑर्डर वाचून मनोमन आनंद झाला आहे.

वादग्रस्त तहसीलदार सिध्देश्वर वरनगावकर यांची तत्काळ बदली करून विभागीय चौकशी करावी या मागणी साठी एक महिन्या पूर्वी दिनांक १८ ऑगस्ट रोजी भल्ल्या पहाटे राम पाऱ्यात सकाळी ८.३० वाजता माहूर येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळ ने पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवास्थानी भेटून निवेदन दिले होते, तर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा माहूर च्या वतीने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना हटवा अन्यथा आमची इतरत्र बदली करा असे निवेदन देत १६ ऑगस्ट २०२१ पासून सामूहिक रजेवर जात असल्याची तक्रार दिली होती.विशेष म्हणजे तलाठी संघटनेकडून झालेल्या तक्रारी नंतर काही तलाठ्यांनी अचानक किनवट येथे बदली सुद्धा करण्यात आली होती.माहूर येथील तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे मागील 6 ते 7 वर्षां पासून माहूर येथे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले होते.आपल्या राजकीय हित संबंधातून व प्रशासकीय मायाजालचा वापर करत मागील पाच वर्षात माहूर येथे नियुक्त करण्यात आलेल्या ५ तहसीलदारांची एका पाठोपाठ एक करीत बदली रद्द करून स्वतःची नियुक्ती त्यांनी कायम ठेवली होती.मात्र आज शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या बदली आदेशात सध्याच्या पदस्थापनेच्या पदावरून या आदेशानुसार एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही,सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त अधिकारी यांनी पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे,सदरहू बदली आदेशांनुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामूळे ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुध्द शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आदेशात नमूद केल्याने या पूर्वी ५ वेळा विविध तहसीलदारांच्या रद्द झालेल्या बदली प्रमाणे आता ६ व्या वेळा आदेश रद्द होण्याची शक्यता कमीच आहे.तूर्तास मागील अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी च्या नेत्याचे व कार्यकर्त्यांचे तहसीलदार बदली प्रकरणाचे वादळ या आदेशाने संपुष्ठात आले असून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी तहसीलदारांच्या बदलीचे आदेश आल्याने तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्याची पण एकाधिकार शाही तून मुक्तता झाली आहे हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!