घर Breaking news अघोरी विद्येचा वापर करून भक्ताला २३ लाखा ला गुंडविले; रक्ताने होम हवन...

अघोरी विद्येचा वापर करून भक्ताला २३ लाखा ला गुंडविले; रक्ताने होम हवन करणाऱ्या भोंदू बाबा ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

माहूर(सरफराज दोसानी):- माहूर येथील एका भोंदू बाबाचा भांडाफोड अनिस च्या मदतीने झाला असून पोलिसांनी त्याला व त्यांच्या अन्य दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. आयुर्वेदिक उपचाराच्या नावाने एका रुग्णाच्या मजबुरीचा फायदा उचलत दैवी शक्ती आपल्याला प्रदान असल्याचे भासवून वेळोवेळी विविध कारणे देऊन बँकेतील आर टी जी एस व इतर स्त्रोत वापरून तब्बल २३ लक्ष १४ हजार ५४९ रुपयां वर डल्ला मारून फसवणूक केल्या प्रकरणी भोंदू बाबा व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांवर माहूर पोलिसात काल दिनांक १३ रोजी रात्री उशिरा ११ वाजेच्या सुमारास फसवणुकी सह महाराष्ट्र नरबळी व ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहूर येथील विश्वजीत रामचंद्र कपीले हा आयुर्वेदीक उपचार करत असून त्याला आलोकीक शक्ती प्राप्त आहे व तो अनेक रोगावर उपचार करतो.अशी माहिती मित्रा कडून प्राप्त झाल्याने माहूर येथील कपिले बाबा यांची ओळख होऊन बाबा च्या होम हवन व इतर विधितून असलेला असाध्य आजार बरा होईल म्हणून तक्रारदार प्रवीण निवृत्ती शेरेकर वय ३९ वर्ष राहणार कोपर रोड, जय गणेश वास्तु डोंबिवली जिल्हा ठाणे हा कपिले बाबा यांनी टाकलेल्या जाळेत अलगद अडकला. उपचाराच्या नावावर अंधश्रद्धेचा वापर करून डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०२० यादरम्यान च्या काळात भोंदू बाबा विश्वजीत कपीले व त्यांनी सांगितलेल्या बैंक अकाउंट क्रमांकवर तक्रारदाराच्या बैंक अकाउंट क्रमांक २०१३१२६६४७४ वरुन १६ लक्ष ५०,हजार रुपये आर टी जी एस द्वारे पाठविण्यात आले. आहे.तक्रार दाराला विश्वजीत कपिले बाबा यास कुटुंब आहे व नागपुर येथे त्याचेवर फसवणुकिचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाली होती.तक्रार दार व शिष्यांना कपिले बाबा हा शारीरीक व मानसिक छळ करुन फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर यासर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी दिनांक ०४.जानेवारी २०२१ रोजी तक्रार दार व उध्दव माने, राहुल आराध्ये असे मिळुन कपिले बाबा याच्याकडे दत्तयोग आश्रमामध्ये व त्याच्या कुटुंबियाकडे पुसद येथे गेले असता रवि कपिले, कैलास कपिले,व इतर एक यांना आम्हांला का फसविले असी विचारणा त्यांनी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देवून तुम्ही आमच्यावर कायदेशिर कारवाई केली तर आम्ही तुमच्यावर व तुमच्या परिवारावर करणी करेन व पोलीस कारवाई ची धमकी दिली. त्यामुळे आम्ही सर्व घाबरुन गेलो व विश्वजीत कपिले व त्याचे कुटुंबियाचे विरुध्द तक्रार दिली नाही.कपिले बाबा हा स्वतःमध्ये देवीशक्तीचा संचार झालेला आहे त्याआधारे दत्तयोग आश्रममध्ये येणाऱ्या आयुर्वेदीक उपचाराच्या नावाखाली हवन, भूतबाधा काढणे, लक्ष्मीबंधन तोडणे मटका आकडा सांगणे पैसे घेवून शक्तीपात देणे, कासव आणि मांडूळ यांचेवर गुप्तधन काढणेसाठी विधी करत असे व गुप्तधन शोधन्यासाठी माहूर किल्ला परिसरात खड्डे खोदले होते. याकामासाठी त्यांचे भाऊ रवि कपिले, कैलास कपिले त्यांना मदत करत होते असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विश्वजीत रामचंद्र कपिले, रवि रामचंद्र कपिले कैलास रामचंद्र कपिले व अन्य एक यांनी संगणमत करुन विश्वजीत रामचंद्र कपिले याचे अंगामध्ये दैवीशक्तीचा संचार असल्याचे भासवून व मला जादुटोनाची व आजारपणाची भिती दाखवून माझा शारीरीक व मानसिक छळ करुन माझ्याकडुन वेळोवेळी एकुण १६,लक्ष ५० हजार आर टी जी एस द्वारे घेवून तसेच रोख स्वरुपात वेळोवेळी दोन लाख व ४,लक्ष ६४ हजार ५४९ असे एकुन २३ लक्ष ,१४ हजार ५४९ रुपयाची फसवणुक केलेली आहे. तरी त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार तक्रार दार प्रवीण निवृत्ती शेरेकर यांनी दिल्यावरून आज दिनांक १३ रोजी रात्री ११ वाजे च्या सुमारास माहूर पोलिसात भोंदू बाबा विश्वजीत रामचंद्र कपिले वय ५२ वर्ष धंदा पुजारी, रवि रामचंद्र कपिले वय ५० वर्ष धंदा-नोकरी, कैलास रामचंद्र कपिले वय ४५ वर्ष व्यवसाय पुजारी सर्व रा.कदम ले आउट पुसद जि. यवतमाळ यांच्या विरूद्ध फसवणुकी सह महाराष्ट्र नरबळी व ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करून पुसद येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक नामदेव रिठे हे करीत असून या प्रकरणात तपासात अधिक धक्कादायक सत्य उजेडात येईल अशी चर्चा एकाव्यास मिळाली.

—– अनेक व्हिडिओ पुरावे ही पोलिसांकडे —-

परिसरात अनेक बाबांनी आपला अनधिकृत डेरा जमविला असून या पैकीच एक असलेल्या कपिले बाबा हा होम हवणाचा विधी अघोरी प्रयोग करत रक्ताने करायचा,गुप्त धनाच्या शोधा साठी त्याने ठीक ठिकाणी खड्डे सुध्दा केले,त्या साठी कासव व मांडूळ चा उपयोग करायचा.यातूनच गणेशाची पुरातन मूर्ती त्याला सापडली होती.याचे संपूर्ण पुरावे असलेले शेकडो व्हिडिओ क्लिप तक्रार कर्त्याकडे असून त्यातून पोलिसांना आवश्यक असलेल्या व्हिडिओ क्लिप देण्यात आल्या आहेत.सध्या एक तक्रारदार व एक साक्षीदार असे दोघे समोर आले असून या भोंदू बाबा ने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असल्याने तपासात अधिकची माहिती पोलिसांना हाती लागू शकेल.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!